वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलचा आज वाढदिवस असून त्याच्यावर भारतातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
वेस्ट इंडीजचा असा एक खेळाडू ज्याचे भारतामध्ये असंख्य चाहते आहेत तो म्हणजे ख्रिस्तोफर गेल. ख्रिस गेल म्हणून अत्यंत लोकप्रिय असलेला क्रिकेट खेळाडू हा त्याच्या आक्रमक खेळी आणि मैदानावरील मस्ती यामुळे भारतामध्ये नावाजला जातो. 1979 साली ख्रिस्तोफर हेन्री गेल याचा जन्म झाला. हा जमैकाचा क्रिकेट खेळाडू आहे जो 1999 पासून वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता . एक आक्रमक फलंदाज, आणि ट्वेंटी-20 क्रिकेट खेळलेल्या महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जातो. ख्रिस गेलने वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय क्रिकेटमधून २०१९ च्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेतली, तर २०२० च्या T20 विश्वचषकात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर तो सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. गेलने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे. पण आजही त्याची खेळी प्रेक्षक विसरु शकलेला नाही.
21 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
21 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
21 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष