फोटो सौजन्य - X
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामन्याची कसोटी मालिका पार पडली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील नुकत्याच संपलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २-२ अशी बरोबरीत सुटली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात ६ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. यामध्ये अनेक खेळाडू जखमी झाले त्यामुळे त्यांच्या जागेवर अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळाली. तर काही खेळाडू संघामध्ये असेही होते ज्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये भारताचा कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, अभिमन्यू ईश्वरण या खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी या दौऱ्यावर मिळाली नाही. पाचवी सामन्यांमध्ये कुलदीप यादव ला संघामध्ये संधी का मिळाली नाही यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्याचबरोबर साई सुदर्शन यांनी फार काही चांगली कामगिरी केली नाही परंतु त्याला या मालिकेत तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर करून नायरने देखील विशेष कामगिरी केली नाही त्याने या मालिकेमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे.
भारताच्या संघामध्ये असा एक खेळाडू आहे ज्याला मागील अनेक वर्षांपासून प्लेइंग इलेव्हनमध्ये एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने अजून कोण टीम इंडियासाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलेले नाही. मालिकेदरम्यान टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये अनेक बदल केले, परंतु अभिमन्यू ईश्वरनला खेळण्याची संधी दिली नाही. २९ वर्षीय फलंदाज संपूर्ण दौऱ्यात संघासोबत राहिला, परंतु संधीची त्याला आस होती. मुख्य मालिकेपूर्वी त्याने दौऱ्यातील दोन सराव सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली.
ओव्हल कसोटीत भारताचे अनेक प्रमुख खेळाडू जखमी झाले होते आणि प्लेइंग ११ मध्ये अनेक बदल करण्यात आले होते, परंतु अभिमन्यू ईश्वरन निराश झाला होता. त्याला संधी मिळाली नाही. यूट्यूब चॅनलवर विकी लालवाणीशी बोलताना, ईश्वरनचे वडील रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन यांनी त्यांच्या मुलाच्या निराशेबद्दल खुलासा केला. रंगनाथन म्हणाले, ‘अभिमन्यू ईश्वरनची निवड न झाल्यामुळे तो निराश झाला होता. मी त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला, ‘बाबा, मला अजूनही स्थान मिळालेले नाही.’ तथापि, संघात निवड न झाल्याने, ईश्वरनने हार मानली नाही आणि तो त्याचे सर्व लक्ष आगामी स्थानिक हंगामावर केंद्रित करत आहे.
ZIM vs NZ 2nd Test: पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर, गोलंदाजांनंतर फलंदाजांनी केला कहर
वडील म्हणाले, ‘अभिमन्यू ईश्वरन दुलीप ट्रॉफीच्या तयारीसाठी बंगळुरूला गेला आहे. तो तिथे १०-१२ दिवस घालवेल. त्यानंतर तो काही काळ डेहराडूनला येईल आणि परत येईल. तो काळजीत होता, पण तो म्हणाला, ‘मी हे स्वप्न २३ वर्षांपासून जगत आहे आणि एक-दोन सामन्यांमध्ये निवड न झाल्याने ते भंग होणार नाही.’