फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
BCCI Central Contract : सध्या भारतामध्ये आयपीएलचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे सर्व भारतीय खेळाडू हे सध्या आयपीएलचे सामने खेळण्यांमध्ये व्यस्त आहेत. भारताच्या संघाने मागील दोन वर्षांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. संघाने T२० विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर लगेचच भारताच्या संघाने दुबईमध्ये वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफी नावावर केली. यावेळी भारताच्या खेळाडूंना बीसीसीआयने मोठी बक्षीस रक्कम देखील. दिली. आता २०२६ मध्ये भारताचा संघ श्रीलंका आणि भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी चर्चेत आहे. भारतीय खेळाडूंच्या केंद्रीय कराराबद्दल बराच काळ चर्चा सुरू आहे.
बीसीसीआय सहसा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केंद्रीय कराराची घोषणा करते, परंतु यावेळी त्यात विलंब झाला आहे. पण आता ताज्या प्रकरणात, बोर्ड पुढील एक ते दोन दिवसांत केंद्रीय कराराची घोषणा करू शकते असे समोर येत आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्त झालेल्या कोहली, रोहित आणि जडेजा यांच्याबद्दल असे वृत्त होते की त्यांना ए प्लस करारातून वगळले जाऊ शकते. तथापि, ताज्या अपडेटनुसार, बीसीसीआय ए प्लस ग्रेडमध्ये कोणताही बदल करण्याच्या मनःस्थितीत नाही.
बीसीसीआयच्या केंद्रीय कराराबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. स्पोर्ट्स टॅकच्या वृत्तानुसार, पुढील एक ते दोन दिवसांत केंद्रीय कराराची घोषणा केली जाऊ शकते. बातमीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ए प्लस श्रेणीमध्ये कोणताही बदल करणार नाही. सध्या, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा ए प्लस ग्रेडमध्ये समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की नवीन करारासाठी सर्व नावे जवळजवळ अंतिम झाली आहेत आणि लवकरच ती जाहीर केली जाईल.
🚨 SHREYAS IYER IN GRADE A 🚨
– Shreyas Iyer is all set to be back in the BCCI Central Contract & He is likely to be in Grade A. [Vipul Kashyap/ANI] pic.twitter.com/slXWf0uAMP
— Johns. (@CricCrazyJohns) April 1, 2025
सूत्रानुसार, बीसीसीआयच्या केंद्रीय करारात श्रेयस अय्यरचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अय्यरची कामगिरी अद्भुत होती. त्याने शानदार फलंदाजी केली आणि टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. यासोबतच, गेल्या काही काळात अय्यरची बॅट देशांतर्गत क्रिकेटमध्येही खूप काही बोलकी ठरली आहे. तथापि, ईशान किशनला केंद्रीय करारात पुनरागमन करणे कठीण वाटते. गेल्या वेळी, इशान आणि अय्यर दोघांनाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग न घेतल्यामुळे केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते.