डॉ. प्रमोद मुळे स्मृती करंडक (फोटो- सोशल मिडिया)
६५ वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत पुण्याच्या सुहासिनी बाकरेने मुंबई शहरच्या उज्वला मराठेचा ११-४,११-६,११-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ६० वर्षांवरील महिला एकेरीत नाशिकच्या स्वाती आघरकरने ठाण्याच्या मनिषा प्रधानचा ६-११,१३-११,११-८,६-११,१२-१० असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. ८० वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत पुण्याच्या सुबोध देशपांडे याने ठाण्याच्या झरीर खंडियाचा ११-४,११-५,११-९ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेच्या प्रायोजक डॉ. विद्या मुळ्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजन सचिव पराग मोकाशी, स्पर्धा संचालक अविनाश जोशी, डेक्कन जिमखानाचे वित्तीय विभागाचे सचिव गिरीश इनामदार, पीडीटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, उपाध्यक्षा स्मिता बोडस, सचिव श्रीराम कोनकर, खजिनदार आशिष बोडस, वेटरन कमिटी सदस्या मनिषा बोडस आदी मान्यवर उपस्थित होते.
उंट, घोडा अन्…! बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय थरार; पुण्यात जगभरातून तब्बल 400…
निकाल: ७० ते ७५ वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:
रंजना पत्की(पुणे) वि.वि.सुनंदा राव(ठाणे) ११-५,११-४,११-७;
वीणा जोशी(पुणे)वि.वि.मनिषा बोडस ११-७,११-२,११-६;
अंतिम फेरी: रंजना पत्की(पुणे) वि.वि.वीणा जोशी(पुणे) १२-१०,११-५,११-३;
65 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:
सुहासिनी बाकरे(पुणे) वि.वि.राजेश्वरी मेहेत्रे(ठाणे)
11-8,11-1,13-11;
उज्वला मराठे(मुंबई शहर) वि.वि.दिपा जैन(ठाणे) 11-6,11-6,11-7;
अंतिम फेरी: सुहासिनी बाकरे(पुणे) वि.वि.उज्वला मराठे(मुंबई शहर) 11-4,11-6,11-6;
60 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:
मनिषा प्रधान(ठाणे) वि.वि.निशा कापसे(ठाणे) 11-9,11-5,11-7;
स्वाती आघरकर(नाशिक)वि.वि.जयश्री नायर(ठाणे)
14-12,11-6,11-4;
अंतिम फेरी: स्वाती आघरकर(नाशिक)वि.वि.मनिषा प्रधान(ठाणे) 6-11,13-11,11-8,6-11,12-10;
80 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
झरीर खंडिया(ठाणे)वि.वि.विनोद दिघे(ठाणे)
11-7,11-8,11-7;
वादळ आलंय…! पोलार्डचा ‘हा’ रेकॉर्ड Jos Buttler तोडणार; केवळ 24 रन्स अन् बनणार ‘किंग’
सुबोध देशपांडे(पुणे)वि.वि.विकास सातारकर(पुणे) 9-11,11-5,11-8,11-4;
अंतिम फेरी: सुबोध देशपांडे(पुणे)वि.वि.झरीर खंडिया(ठाणे)11-4,11-5,11-9.






