फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताच्या संघाने आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले तर इतर संघाना एक वेळा पराभुत करुन एकही सामना न गमावता आशिया कप जिंकला आहे. पण त्यानंतर आशिया कप 2025 च्या ट्राॅफीवरुन मोठा वाद पाहायला मिळाला. अजूनपर्यत भारताच्या संघाला आशिया कप 2025 ट्राॅफी देण्यात आलेली नाही. टीम इंडियाने २०२५ चा आशिया कप ट्रॉफी जिंकला नसेल, पण या स्पर्धेचे आयोजन केल्याने बीसीसीआयला १०० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
बीसीसीआयच्या २०२५-२०२६ च्या वार्षिक बजेटनुसार, यावर्षी ६७०० कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलचे मूल्यांकन सलग दुसऱ्या वर्षी कमी झाले आहे, तरीही बीसीसीआय अजूनही नफ्यात आहे. मोहसिन नक्वीने ट्रॉफी सोबत नेली असेल, पण तो बीसीसीआयला नफा कमावण्यापासून रोखू शकला नाही.
South Africa A Squad : भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका अ संघाची घोषणा, टेम्बा बावुमाचा संघात समावेश
बीसीसीआयच्या वार्षिक अर्थसंकल्पीय कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की आशिया कपने ₹१०९ कोटींचा नफा कमावला. अहवालात म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमधून ₹१०९.०४ कोटींचा नफा झाला, ज्यामध्ये आशिया कप होस्टिंग फी, टीव्ही हक्कांमधून मिळणारे उत्पन्न आणि आयसीसी टी२० विश्वचषकातील सहभाग शुल्क यांचा समावेश आहे. मीडिया हक्कांमुळे ₹१३८.६४ कोटींचा नफा झाला, जो मागील वर्षीपेक्षा जास्त आहे.” आठ वर्षांत बीसीसीआयच्या नफ्यात १० पट वाढ झाली आहे.
आशिया कप जिंकल्यानंतर, टीम इंडियाने एसीसी प्रमुख आणि पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी हे ट्रॉफी देणारे आपणच आहोत यावर ठाम होते आणि बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांनी कप सोबत घेतला. तेव्हापासून टीम इंडियाला आशिया कप ट्रॉफी मिळालेली नाही. काही वृत्तांनुसार, आशिया कप ट्रॉफी सध्या दुबईतील एसीसीच्या कार्यालयात आहे. टीम इंडियाला अद्याप त्याचा कप मिळालेला नाही.
बीसीसीआय दरवर्षी मोठ्या प्रमाणात नफा कमवत असताना, आयपीएलचे मूल्यांकन वाढत आहे. अहवाल दर्शवितात की २०२५ मध्ये इंडियन प्रीमियर लीगचे मूल्य ₹७६,१०० कोटी (यूएस $१.२ अब्ज) असण्याचा अंदाज आहे, जो गेल्या वर्षीच्या २०२४ मध्ये ₹८२,७०० कोटी (यूएस $१.२ अब्ज) पेक्षा लक्षणीय घट आहे. परिणामी, बीसीसीआयला ₹६,६०० कोटी (यूएस $१.६ अब्ज) तोटा सहन करावा लागला आहे.