हार्दिक - कुलदीप यादवला डच्चू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आलेले नाही. सूर्यासोबतच, स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनाही टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. अनेक चाहत्यांना यामुळे धक्काही बसला आहे. सोशल मीडियावर तर यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान सूर्यकुमारला एक संधी मिळायला हवी होती असंही अनेकांना वाटत आहे.
IND vs AFG: IPL चा फ्लॉप शो टेस्ट क्रिकेटमध्येही चालू, Yashasvi Jaiswal पुन्हा अपयशी
हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आहे की खराब फॉर्मबद्दल शिक्षा?
सूर्यासोबतच हार्दिक पांड्यालाही टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पांड्याला वगळण्यामागचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, “हार्दिक एकदिवसीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढील एकदिवसीय विश्वचषक अजून १८ महिन्यांनी आहे, त्यामुळे टी-२० सामन्यांदरम्यान खेळाडूंना विश्रांती देण्याचा आणि रोटेशन धोरण अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हार्दिक संघाला उत्कृष्ट संतुलन देतो. जेव्हा तो पुन्हा गोलंदाजी सुरू करेल, तेव्हा आम्ही त्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करू.”
आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवड समितीने हार्दिकला वगळण्यामागे रोटेशन धोरणाचे कारण दिले असले तरी, हार्दिकचा अलीकडील टी-२० फॉर्म अत्यंत निराशाजनक राहिला आहे हेही तितकेच खरे आहे. विशेषतः आयपीएल २०२६ मध्ये तो आपल्या कर्णधारपदाने आणि खेळाने छाप पाडण्यात अपयशी ठरला. हार्दिक सगळ्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक प्रकाशझोतात आलेला दिसून येत आहे. १९ व्या हंगामात मुंबईकडून खेळताना हार्दिकने १० सामन्यांमध्ये केवळ २१० धावा केल्या आणि फक्त ४ बळी घेतले. दरम्यान आयपीएल मुंबई संघाची कर्णधारपदाची धुराही हार्दिककडून गेली आहे.
कुलदीप यादवलाही टी-२० संघातून वगळले
केवळ हार्दिक आणि सूर्याच नाही, तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवलाही भारतीय टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी रवी बिश्नोईचा संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादवचीही अलीकडील टी-२० कामगिरी खराब राहिली आहे. शिवाय, आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना तो पूर्णपणे अपयशी ठरला. कुलदीपने यावेळी आपली छाप अजिबात सोडली नसल्यानेच त्याची निवड होऊ शकली नाही.
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठी टी२० संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी






