Ibrahim Zadran : इब्राहिम झद्रान अफगाणिस्तानचा पहिला शतकवीर, चॅम्पियन्स ट्रॉफीचा २७ वर्षांचा इतिहास बदलला
Champions Trophy 2025 : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर इब्राहिम झद्रानने इतिहास रचला. तो एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा पहिला अफगाणिस्तानी खेळाडू ठरला. गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध झद्रानने शतक झळकावले होते. त्याने १०६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक होते. त्याने या शतकासह सचिन, विराट, रोहित शर्माच्या रेकॉर्डलासुद्धा मागे टाकले.
इब्राहिम झद्रान
जाद्रानने इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच झोडपले. इंग्लंडचे गोलंदाज त्याच्याविरुद्ध संघर्ष करताना दिसले. एवढेच नाही तर जद्रानने १४६ चेंडूंचा सामना करत १७७ धावांची शानदार खेळी केली. त्याने त्याच्या खेळीत १२ चौकार आणि ६ षटकार मारले.
शतक ठोकल्यानंतर झद्रानने असा साजरा केला
२३ वर्षीय इब्राहिम झद्रानने शतक ठोकल्यानंतर वेगळ्याच शैलीत आनंद साजरा केला. शतक पूर्ण केल्यानंतर, जद्रानने त्याचे हेल्मेट काढले आणि हात जोडले. ड्रेसिंग रूमकडे पाहत तो काहीतरी इशारा करत होता. झद्रान हा अफगाणिस्तानचा असाच एक फलंदाज आहे जो संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. जद्रानच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. झद्रान रहमानउल्लाह गुरबाजनंतर तो अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. गुरबाजने एकदिवसीय सामन्यात ८ शतके केली आहेत.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता अफगाणिस्तान एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात जो संघ हरेल तो उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. गेल्या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही अफगाणिस्तानने प्रवेश केला होता, ज्यामध्ये त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता.