अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूवर ICC ची कारवाई (Photo Credit-X)
Haris Rauf Fine: आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचे खेळाडू साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांनी केलेल्या गैरवर्तनाची तक्रार बीसीसीआयने आयसीसीकडे केली होती. या तक्रारीनंतर, आयसीसीने आता दोन्ही पाकिस्तानी खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे.
आयसीसीच्या चौकशीनंतर, हरिस रौफ यांना आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे, त्यांना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. सीमारेषेजवळ उभे राहून त्यांनी भारताविरुद्धच्या सामन्यात अनुचित हावभाव केले होते. त्याचप्रमाणे, सामन्यादरम्यान त्याची भारताच्या अभिषेक शर्मासोबतही झटापट झाली होती, ज्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागले आहेत.
Haris Rauf fined 30 per cent of his match fees for abusive behaviour and aggressive gesture during Indo-Pak Asia Cup game: Tournament Sources. — Press Trust of India (@PTI_News) September 26, 2025
दरम्यान, पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने भारताविरुद्ध अर्धशतक झळकावले होते आणि त्यानंतर बंदुकीच्या गोळीने आनंद साजरा केला होता. त्याला मात्र फक्त इशारा देऊन सोडून देण्यात आले आहे.
Gun Celebrations : धोनी-कोहली आले धावून! साहिबजादा फरहानवरील ICC ची कारवाई टळली…
भारत आणि पाकिस्तानने सध्याच्या आशिया कप स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. गट टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवले होते. त्यानंतर, सुपर फोरमधील सामन्यातही शेजारील पाकिस्तानवर ६ विकेट्सने विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेत जोरदार कामगिरी करत सलग पाच सामने जिंकले आहेत आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने दोन सामने गमावले असले तरी, अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० आशिया कप २०२५ चा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. १९८४ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत तब्बल ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच अंतिम सामना दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये होणार आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.