गौतम गंभीर, रॉहित शर्मा आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
India Tour of England 2025 : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अखेर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत आपले मौन सोडले आहे. निवृत्ती हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्याने म्हटले आहे आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. २० जूनपासून लीडसमध्ये सुरू होणाऱ्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी बोलताना, गंभीरने भारताच्या दोन महान खेळाडूंच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या पोकळीवर भाष्य केले.
हेही वाचा : RCB vs SRH : ज्याला टीम इंडियाने दाखवला बाहेरचा रस्ता, त्या Bhuvaneshwar Kumar ने रचला इतिहास; वाचा सविस्तर…
खेळ कधी सुरू करायचा आणि कधी संपवायचा हा पूर्णतः वैयक्तिक निर्णय असतो, असे गंभीरने एका मुलाखतीत म्हटले आहे. कोणालाही निवृत्ती कधी घ्यावी हे सांगण्याचा अधिकार नाही – मग तो प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा या देशातील कोणीही असो. हा निर्णय अंतःकरणातून घ्यावा लागतो. रोहित आणि कोहली दोघेही या महिन्याच्या सुरुवातीला कसोटीमधून दूर गेले, ज्यामुळे क्रिकेटमधील भारतीय एक दशकाहून अधिक पर्वाचा अध्याय संपला.
गंभीरने मान्य केले की, रोहित आणि विराटच्या अनुभवाची निश्चितच उणीव भासेल, पण ही वेळ युवा खेळाडूंना संधी देणारी आहे, असेही तो म्हणाला. हो, ते कठीण असेल, पण अनेक खेळाडू पुढे येतील. कोणीतरी बाहेर गेल्यावर दुसऱ्याला देशासाठी काहीतरी विशेष करण्याची संधी मिळते. गंभीरने जसप्रीत बुमराहशिवाय भारताने जिंकलेली चॅम्पियन्स ट्रॉफीचे उदाहरण देत सांगितले की, वरिष्ठ खेळाडू नसले तरी संघ ‘यशस्वी होऊ शकतो.
आज नवीन कसोटी कर्णधार जाहीर होणार? दरम्यान, बीसीसीआय शनिवारी कसोटी संघ आणि भारताचा नवीन कसोटी कर्णधार जाहीर करण्याची शक्यता आहे. गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनराइझर्स हैदराबादकडून ४२ धावांनी पराभूत व्हावे लागले आहे. हा सामना लखनऊच्या सवाई मानसिंह स्टेडीयमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या संघाने ६ गडी गमावत २३१ धावा केल्या होत्या. या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ १८९ धावांतच गारद झाला. बंगळुरुकडून फील सॉल्टने ३२ चेंडूत ६२ धावांची कहली केली. तसेच विराट कोहलीने देखील २५ चेंडूत ४३ धावा केल्या परंतु ते संघाला विजयी करू शकले नाहीत.