फोटो सौजन्य – X (BCCI)
वॉशिंग्टन सुंदरची मुलाखत : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा काल चौथा दिवस पार पडला. यामध्ये भारताचा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने चमकदार कामगिरी केली. मागील सामन्यांमध्ये त्याने बॅट चालवली होती या सामन्यात त्याने त्याचा गोलंदाजी जादू देखील दाखवली. भारताच्या संघाने विशेषतः गोलंदाजांनी मैदानावर कहर केला. कालचे चौथ्या दिने इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी 62 ओव्हर मध्ये गुंडाळलं.
इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात 192 धावा केल्या. यामध्ये एकही फलंदाज 40 चा आकडा पार करू शकला नाही, जो रूटने चाळीस धावा केलाय. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले, नितेश कुमार रेड्डी आणि आकाशदीप यांच्या हाती एक विकेट लागला. तर वॉशिंग्टन सुंदर याने कौतुकास्पद कामगिरी केली. वॉशिंग्टन सुंदर याने चार विकेट्स घेतले आणि हे भारतीय संघासाठी फारच फायदेशीर ठरले. वॉशिंग्टन सुंदर याने जो रूट, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ आणि शोएब बशीर ज्यांना पॅव्हेलियनचा यांचा रस्ता दाखवला.
काय म्हणाला वॉशिंग्टन सुंदर?
वॉशिंग्टन सुंदर याला भारतीय विजयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला, यावेळी तो म्हणाला नक्कीच भारताचा संघ उद्या जिंकणार आहे. त्यानंतर पत्रकाराने तुम्ही कधी जिंकणार आणि कोणत्या स्टेशन मध्ये जिंकणार हा देखील प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पटकन उत्तर दिले की लंच नंतर आमचा विजय होईल. हे उत्तर ऐकून क्रिकेट चाहत्यांनी वॉशिंग्टन सुंदरवर कौतुकाचा वर्षाव केला.
“Defninitely India winning tomorrow!” 😁
Washington Sundar reflects day four for India at Lord’s 🇮🇳 pic.twitter.com/ha7iCscMMh
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 13, 2025
सुंदरच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज तुटून पडले. त्याने प्रथम जो रूटला बाद केले . त्यानंतर त्याने कर्णधार बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथलाही बाद केले . त्याच वेळी, दहावी विकेट म्हणून सुंदरने शोएब बशीरलाही बाद केले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्यास भाग पाडले . विशेष म्हणजे सुंदरने या सर्व फलंदाजांना क्लीन बोल्ड केले , जे कौतुकास्पद आहे . सुंदरने १२.१ षटके गोलंदाजी केली आणि १.८० च्या किफायतशीर इकॉनॉमी रेटसह फक्त २२ धावा खर्च करून ४ विकेट घेतल्या .
इंग्लंडने पहिल्या डावात जो रूटच्या १०४ धावांच्या शतकाच्या जोरावर ११२.३ षटकांत ३८७ धावा केल्या , ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघानेही शानदार फलंदाजी दाखवली आणि ११९.२ षटकांत ३८७ धावा केल्या . भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १०० धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडला फारसे काही करता आले नाही. इंग्लंडचा संघ ६२.१ षटकांत १९२ धावांवर ऑलआउट झाला . भारताला १९३ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.