भारताचे न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य (फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ ODI Series : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत केएल राहुलच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर ७ गडी गमावून न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात केएल राहुलने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करत चेंडूत नाबाद धावा केल्या आणि संघाचा डाव पर्यंत पोहचवला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीने डावाची सुरुवात केली. शर्मा आणि गिल यांनी पहिल्या विकेट्ससाठी ७० धावांची भागीदारी रचली. रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात देखील काही खास करू शकला नाही. तो ३८ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला विराट कोहली मैदानावर आयाला आणि त्याने गिलसोबत डाव सवरण्याचा प्रयत्न केला मात्र दरम्यान कर्णधार शुभमन गिल आपले अर्धशतक पूर्ण करून बाद झाला. त्याने ५३ चेंडूत ५६ धावा केल्या. यंदये त्याने ९ चौकार आणि १ षटकार लागवला. तिसऱ्या नंबरवर आलेला विराट कोहली सुरवातीला चांगला दिसून आला परंतु त्याला २३ धावाच करता आल्या. त्याला ख्रिश्चन क्लार्कने बाद केले. त्यानंतर आलेला संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर काही खास करू शकला नाही. तो ८ धावा करून ख्रिश्चन क्लार्कचा शिकार बनला.
एक वेळ भारत ११८ धावांवर असताना ४ विकेट्स गेल्या होत्या. भारताचा डाव संकटात आला असताना संकटमोचक केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी ७३ चेंडूत ८८ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. दरम्यान, जाडेजा २७ धावा करून बाद झाला. दरम्यान, केएल राहुलने अर्धशतक पूर्ण केले आणि चौफेर फटकेबाजी सुरूच ठेवली. मैदानात आलेल्या नितीश कुमार रेड्डीसोबत राहुलने ५७ चेंडूत ५० धावा करत भारताला सुस्थितीमध्ये पोहचवले.
रेड्डी २० धाव करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुलने तळाच्या खेळाडूसोबत भागीदारी करत भारताचा डाव सन्मानजक धावसंख्येपर्यंत पोहचवला. त्याने आपले शतक देखील पूर्ण केले. दरम्यान हर्षित राणा २ धावा करून बाद झाला तर. राहुलने ९२ चेंडूत नाबाद ११२ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ११ चौकार आणि १ षटकार लागवला. तर मोहम्मद सिराज २ धावा काढून नाबाद राहीला आणि भारताने ७ विकेट्स गमावून २८४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ख्रिश्चन क्लार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर , मायकेल ब्रेसवेल, जेडेन लेनोक्स, काइल जेमिसन आणि झॅकेरिन फॉल्क्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : WPL 2026 : हरमनप्रीत कौरने घडवला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारी ती ठरली जगातील पहिलीच खेळाडू
भारताचा प्लेइंग ११ : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
न्यूझीलंडचा प्लेइंग ११ : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (यष्टिरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स
बातमी अपडेट होत आहे…






