सौजन्य - BCCI मुंबई कसोटीत टीम इंडिया चमकली, 9 विकेट्स गमावून न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी
IND vs NZ 3rd Test 2nd Day Report : मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची धावसंख्या 9 गडी बाद 171 धावा आहे. अशाप्रकारे किवी संघाची आघाडी १४३ धावांपर्यंत वाढली आहे. न्यूझीलंडकडून एजाज पटेल आणि विल्यम ओरुक नाबाद आहेत. त्याचबरोबर रवींद्र जडेजा हा भारतासाठी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. रवींद्र जडेजाला दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्सचे यश मिळाले. याशिवाय रवी अश्विनने 3 फलंदाजांना आपले बळी बनवले. आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदरने 1-1 विकेट घेतली. आज दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे 15 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.
भारतीय संघाची शानदार गोलंदाजी
What a way to get the final wicket of the day 🙌
Make that 4⃣ for Ravindra Jadeja 👏👏
Scorecard – https://t.co/KNIvTEyxU7#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @imjadeja pic.twitter.com/r6sTQSHgYf
— BCCI (@BCCI) November 2, 2024
ऋषभ पंत आणि शुभमन गिल चमकले, पण बाकीचे…
याआधी भारताने दुसऱ्या दिवसाच्या 4 बाद 84 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी ९६ धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. त्यामुळे भारतीय संघ अवघ्या 263 धावांवर बाद झाला.
भारतीय खेळी गडगडली
ऋषभ पंत ५९ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तर शुभमन गिलने 146 चेंडूत 90 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला. यानंतर भारतीय फलंदाजांची सतत पॅव्हेलियनमध्ये परतण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर्फराज खान एकही धाव न काढता चालता झाला. रवींद्र जडेजाने 14 धावा केल्या. तर रविचंद्रन अश्विनने ६ धावांचे योगदान दिले. आकाशदीप शून्यावर बाद झाला. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने 38 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांची कामगिरी
न्यूझीलंडसाठी भारतीय वंशाचा एजाज पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एजाज पटेलने 5 फलंदाजांना बाद केले. याशिवाय मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोधीने प्रत्येकी 1 बळी घेतला.