कुलदीप यादव आणि साई सुदर्शन(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : दोन बळी अन् रवींद्र जडेजाने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला ‘हा’ पराक्रम
दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवसाची सुरुवात बिनबाद 26 धावांवरुन पुढे केली. एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी ५९ धावा उभ्या केल्या. रायन रिकेल्टन ३५ आणि मार्कराम २९ धावांवर बाद झाले. कर्णधार बावुमाने ३ आणि टोनी डी झोर्झीने ४९ धावांचे योगदान दिले. स्टब्सने ९४ धावा केल्या तर वियान मुल्डर ३५ धावांवर नाबाद राहिला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला मैदानात उतरलेला स्टब्स ९४ धावांवर बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने ५ बाद २६० धावांवर डाव घोषित केला. पहिल्या डावात २८८ धावांच्या आघाडीच्या आधारे, दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
भारतीय संघ चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ५४९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. परंतु, भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताची सलामी जोडी केएल राहुल (६ धावा) आणि जयस्वाल (१३ धावा) झटपट बाद झाले. आता मैदानावर साई सुदर्शन(२ धावा) आणि कुलदीप यादव(४ धावा ) खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅन्सेन आणि हार्मर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा : लग्नाआधी वाद विकोपाला! धक्कादायक चॅट व्हायरल; पलाश मुच्छलकडून स्मृती मानधनाची फसवणूक?






