भारत अ विरुद्ध श्रीलंका अ फायनलमध्ये भिडणार (फोटो- सोशल मीडिया)
ट्राय सिरिजच्या (Vaibhav Sooryavanshi) फायनलमध्ये भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघ आमनेसामने येणार आहेत. मागील सामन्यात भारत आणि श्रीलंकेच्या संघात वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले होते. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे फायनलचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
श्रीलंका अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 322 रन्स केल्या होत्या. त्या रन्सचा पाठलाग करताना अफगणिस्तानचा संघ 219 रन्सवर ऑल आउट झाला. श्रीलंकेने अफगणिस्तानवर 103 रन्सने विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये श्रीलंका आणि भारत ही दोन संघ आमनेसामने येणार आहेत.
भारत अन् श्रीलंका भिडणार
ट्राय सिरिजमध्ये भारत अ अन् श्रीलंका अ संघ आमनेसामने येणार आहेत. 21 जून रोजी हा सामना होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. ट्राय सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशी साजेशी खेळी करू शकला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IND A vs SL A: चर्चा तिलक वर्माच्या ‘त्या’ कृतीची; सुपर ओव्हरआधी अंपायरसोबत थेट…, Video Viral
वैभव सूर्यवंशीसोबतचा वाद नडला
१५ जून रोजी डंबुला येथे झालेल्या ‘इंडिया अ’ विरुद्ध ‘श्रीलंका अ’ सामन्यांनंतर निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता संबंधित खेळाडूंवर उमटले आहेत. सामना संपल्यानंतर भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि ‘श्रीलंका अ’च्या काही खेळाडूंमध्ये झालेली शाब्दिक चकमक आणि त्यानंतर झालेली झटापट यांमुळे ‘श्रीलंका क्रिकेट’ने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. ‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, ‘श्रीलंका क्रिकेट’ने सामन्यानंतरच्या वादात सहभागी असलेल्या खेळाडूंना दंड ठोठावला आहे. यामध्ये श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलांबागे याचाही समावेश आहे, ज्याची वैभव सूर्यवंशीसोबत शाब्दिक चकमक झाली होती आणि त्याचे रूपांतर नंतर झटापटीत झाले होते.






