तिलक वर्मा अन् अंपायरमध्ये वाद (फोटो- ट्विटर/@AbhiMSD_07 )
तिलक वर्माने अंपायर सोबत घातला वाद
श्रीलंका अ संघाने केला भारत अ संघाचा पराभव
सुपर ओव्हरमध्ये भारताचा संघ पराभूत
India A Vs Sri Lanka A: आज भारत अ आणि श्रीलंका अ या दोन संघांध्ये महत्वाचा सामना पार पडला. भारताने प्रथम फलांडजाई करताना सुयश शेडगे आणि विप्रज निगमच्या खेळीच्या जोरावर २६६ रन्सचे टार्गेट श्रीलंकेला दिले होते. अखेर हा सामना टाय झाला आणि त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव झाला आहे. दरम्यान या सामन्यात कर्णधार तिलक वर्मा आणि अंपायरमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
तिलक वर्मा आणि अंपायरमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. हे सर्व प्रकरण जेव्हा सुपर ओव्हर होणार होती तेव्हा झाले. सुपर ओव्हरमध्ये भारताला प्रथम गोलंदाज करावी लागली. सुपर ओव्हरमध्ये शेवटचा बॉल अंपायरने नो बॉल दिला. त्यावर हे सर्व प्रकरण तापल्याचे दिसून आले.
IND A Vs SL A Live: विजयाच्या उंबरठ्यावरून मॅच निसटली! सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत पराभूत
श्रीलंका आणि भारत यांच्या सामन्यात आज सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये श्रीलंकेने भारतावर विजय मिळवला आहे. दरम्यान भारताची गोलंदाजी असताना शेवटचा बॉल नो बॉल दिल्याने कर्णधार तिलक वर्मा आणि अंपायरमध्ये बाचाबाची झाली. तिलक वर्मा यावेळेस अत्यंत रागाने अंपायरसही बोलताना दिसून येत होता. तेव्हा अन्य खेळाडू मध्ये आणि तिलक वर्माला बाजूला करण्यात आले.
Vaibhav stopping Captain Tilak from arguing with the umpires 😂 pic.twitter.com/m5mnD1wtNa — Abhi (@AbhiMSD_07) June 15, 2026
हा सामना संपला तेव्हा लाइट्स कमी असल्याने अंपायर सुपर ओव्हर खेळवण्यास तयार नव्हते. या निर्णयावर तिलक वर्मा नाखुश झाला. त्याने सुपर ओव्हर खेळवण्यासाठी अंपायरशी खूप वेळ बाचाबाची केली. या सामन्यात भारताचा पराभव झाला. जर सुपर ओव्हर खेळवण्याची मागणी केली गेली नसती तर सामना टाय झाला असता आणि भारताला एक पॉइंट मिळाला असता. मात्र या बाचाबाचीकहा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
पराभव होताच श्रीलंकेने डिवचले
सामना पूर्ण झाल्यावर वैभव आणि श्रीलंकेचे खेळाडू आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर वैभव सूर्यवंशी रन करू शकला नाही. त्यामुळे भारत पराभूत झाला. त्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू जल्लोष करत होते. त्यातील काही जणांनी सुयश शेडगे आणि वैभवच्या दिशेने पाहून काहीतरी भाष्य केले.
त्यानंतर वैभव आणि श्रीलंकेचा खेळाडू भिडले. वैभवने त्याला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. दोन्हीकडून धक्काबुक्की केले गेली. मात्र तेव्हा अन्य खेळाडू मध्ये आले आणि हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस वैभव सूर्यवंशी प्रचंड रागात असल्याचे पाहायला दिसून आले. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.






