IND VS ZIM Live Streaming (फोटो- ians)
थोड्याच वेळात सुरू होणार भारत- झिम्बाब्वे सामना
टी 20 सिरिज जिंकण्याचे श्रेयस समोर आव्हान
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष
India Vs Zimbabwe T20 Series Live Updates: थोड्याच वेळात भारत अन् झिम्बाब्वे यांच्यातील पहिला सामना सुरू होणार आहे. श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचे तर झिम्बाब्वेचे नेतृत्व सिकंदर रझा करणार आहे. हरारे क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दरम्यान श्रेयस अय्यर आज आपला पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. आजचे पीच हे प्रथम गोलंदाजी करण्यासाठी योग्य म्हटले जात आहे. नुकताच टॉस पार पडला. भारताने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रेयस अय्यर सध्या भारतीय टी 20 संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आतापर्यंत दोन टी 20 सिरिज खेळल्या आहेत. मात्र सिरिज सोडा एकही टी 20 सामना भारतीय संघ जिंकू शकला नाही. आयर्लंडने इतिहासात प्रथमच भारतीय संघाला पराभूत केले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ अपयशी ठरला आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धची टी 20 सिरिज भारतीय संघ आणि खास करून कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरसाठी अत्यंत महत्वाची असणार आहे.
IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
आजच्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी देखील खेळताना दिसणार आहे. इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशी चांगली खेळी करू शकला नव्हता. तीनही सामन्यात तो 15 ते 20 रन्सच्या मध्यात आउट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्याने शॉर्ट बॉलवर बऱ्याच सराव केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीचे अपेक्षा केली जात आहे.
हरारे स्टेडियमचा रिपोर्ट
एकूण सामने 75
प्रथम फलंदाजी करताना विजय – 39
टार्गेटचा पाठलाग करताना विजय – 34
टॉस जिंकून विजय – 39
टॉस हरल्यावर विजय – 34
दोन्ही संघातून कोण खेळणार?
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.






