भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात आज पहिला सामना होणार आहे. या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे.
वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी 20 सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकला नव्हता. त्यामुळे या सिरिजमध्ये त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सिरिजमध्ये त्याच्याकडे एक नवा रेकॉर्ड रचण्याची संधी असणार आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध तीनही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. या सिरिजमध्ये एकूण 11 सिक्स मारताच वैभव सूर्यवंशी आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड करणार आहे. या सिरिजमध्ये एकूण 11 सिक्स मारण्यास वैभव सूर्यवंशी यशस्वी ठरला तर तो टी 20 सिरिजमधील सर्वात वेगवान 150 सिक्स पूर्ण करणार खेळाडू ठरणार आहे.
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये खेळताना 37 सामन्यांमध्ये 139 सिक्स मारले आहेत. त्यामुळे आताच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये त्याने 11 सिक्स मारले तर तो एक नवा रेकॉर्ड रचणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 150 सिक्सर मारणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद होणार आहे.
हरारेवर केली 175 रन्सची खेळी
हरारे येथील स्टेडियम वैभव सूर्यवंशीसाठी अगदी खास आहे. वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी भारताचा अंडर 19 संघ वर्ल्डकप जिंकला होता. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीने 175 रन्सची शानदार खेळी केली होती. वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेमध्ये 9 युथ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 439 रन्स केल्या होत्या.
IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.






