( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आजच्या डिजिटल युगात मुले दररोज सरासरी चार तास ऑनलाइन घालवत असल्याने डिजिटल सुरक्षितता हा देशासमोरील एक महत्त्वाचा विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर राजकुमार हिरानी फिल्म्स निर्मित आणि जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणारी समीक्षकांची प्रशंसा मिळालेली ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही मालिका देशभरातील हजारो शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी व्यापक अभियान राबवत आहे.
अभ्यासानुसार, भारतातील सुमारे ३३ टक्के मुलांना सायबर बुलिंग किंवा ऑनलाइन शोषणाचा काही ना काही प्रकार अनुभवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही मालिका सायबर गुन्हे, डिजिटल गोपनीयता आणि जबाबदार ऑनलाइन वर्तन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करते. रंजक कथानकाच्या माध्यमातून मुलांना ऑनलाइन सुरक्षिततेचे धडे देतानाच सहानुभूती, मानसिक खंबीरपणा, सकारात्मक डिजिटल वर्तन आणि ऑनलाइन छळाविरोधात ठामपणे उभे राहण्याची प्रेरणाही देते.
देशव्यापी शैक्षणिक अभियान
मालिकेचा संदेश अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात संयुक्त शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. EducationWorld आणि DAV United या संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, देशभरातील शाळांमध्ये मालिकेचे विशेष प्रदर्शन, मार्गदर्शित वर्गचर्चा तसेच पालक आणि शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.
या माध्यमातून ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणारे प्रभावी शैक्षणिक साधन ठरत आहे.
कथाकथनाच्या प्रभावी माध्यमाचा वापर करून हा संयुक्त उपक्रम तंत्रज्ञानाविषयीची भीती दूर करत विद्यार्थ्यांना सुरक्षित, जबाबदार आणि जागरूक डिजिटल नागरिक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.आहे.






