DC vs SRH : आयपीएल 2025 मध्ये आज (30 मार्च) रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स प्रथम गोलंदाजी करताना दिसून येणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ नवा कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळत असून त्याला आजच्या सामन्यात मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.
आयपीएल 2025 मध्ये दिल्ली संघाने आयपीएलच्या 18 व्या हंगामाची विजयासह सुरुवात केली आहे. त्यानंतर आता संघाचा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादशी खेळवण्यात येत आहे. अक्षर पटेलला या सामन्यात काही खास विक्रम करण्याची संधी चालून आली आहे.
कर्णधार अक्षर पटेल हा दिल्ली कॅपिटल्ससाठी एक महत्त्वाचा खालच्या फळीतील फलंदाज आहे, जो अनेकदा मोठे शॉट्स खेळण्यासह डेथ ओव्हर्समध्ये वेगवान धावा काढण्यासाठी ओळखला जातो. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याने आतापर्यंत 48 षटकार ठोकले आहेत. जर तो हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 2 षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर तो डिसी साठी 50 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत सामील होणार.
हेही वाचा : GT vs MI : आशिष नेहरा रागाने लालबुंद? दोन हात पुढे करून केली गर्जना..! नेमकं काय घडलं? पहा VIDEO
दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आतापर्यंत केवळ 5 फलंदाजांनी 50 किंवा त्याहून अधिक षटकार लगावण्याचा पराक्रम केला आहे. या विशेष यादीमध्ये ऋषभ पंत पहिल्या तर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आहे. तर तडाखेबाज माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आहे. पृथ्वी शॉचा पाचवा नंबर लागतो.
ऋषभ पंत – 157
डेव्हिड वॉर्नर – 93
वीरेंद्र सेहवाग – 89
श्रेयस अय्यर – 88
पृथ्वी शॉ – 61
याशिवाय अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सच्या एक हजार क्लबमध्ये सामील होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यासाठी त्याला फक्त 11 धावांची गरज आहे. त्याने दिल्लीसाठी 64 डावात आपल्या बॅटने 989 धावा केल्या आहेत. SRH विरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडे 1000 धावा पूर्ण करण्याची मोठी संधी असेल. 11 धावा करून तो दिल्लीसाठी 1000 धावा करणारा 10वा फलंदाज ठरेल.
हेही वाचा : MI vs GT : GT कडून पराभव, पण Rohit Sharma ने रचला मोठा विक्रम; आयपीएल इतिहासातील ठरला 3 रा भारतीय
दिल्ली कॅपिटल्स संघ
अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक),जेक-फ्रेजर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, मोहित शर्मा, कुलदीप यादव.
सनरायझर्स हैदराबाद संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन,अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, झीशान अन्सारी.