जसप्रीत बुमराहने पास केली फिटनेस टेस्ट (फोटो - ians)
जसप्रीत बुमराहने आपली फिटनेस टेस्ट पास केल्याचे समजते आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी अत्यंत चांगली बातमी समोर आली आहे. बेंगळुरूमध्ये सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये जसप्रीत बुमराहने आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्ध दोन्ही कसोटी सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेचे टेंशन वाढले आहे. जसप्रीत बुमराह आल्यामुळे भारताची ताकद नक्कीच वाढली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही सिरिज महत्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला किमान 9 पैकी 7 सामने जिंकणे आवश्यक असणार आहे. तरच भारत फायनलमध्ये जाऊ शकतो.
IND Vs SL: लंकेची वाट लावणार Team India! भारतीय संघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज; काय सांगतो रेकॉर्ड?
लंकेची वाट लावणार Team India
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सिरिज केवळ द्विपक्षीय लढत नसून, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पॉईंट्स टेबलच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे. 7 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये चार दिवस सराव सामना खेळवला जाणार आहे. तर पहिला सामना 15 ते 19 तर दुसरा सामना 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल भारताचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये 9 सामन्यानंतर 48.15 पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे.






