KKR Vs RCB : कोलकाता नाईट रायडर्सचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 175 धावांचे आव्हान; रहाणे, नरेन चमकले..(फोटो-सोशल मीडिया)
KKR Vs RCB : आजपासून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामास सुरवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत कर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या जोरावर 174 धावांपर्यंत मजल मारली आहे. आरसीबीसमोर आता 175 धावांचे आव्हान असणार आहे.
नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु कर्णधार रजत पाटीदारचा हा निर्णय चुकीचा ठरवत केकेआरने पहिल्या 10 ओव्हरमध्येच 100 धावा केल्या. यावेळी केकेआरची सुरवात थोडी खराब झाली. क्विंटन डी कॉक झटपट बाद होऊन माघारी परतला. त्याला हेझलवूडने बाद केले. त्याने 5 चेंडूत 4 धावा केल्या. मात्र त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपला शानदार खेळ दाखवत सुनील नरेनच्या साथीने तूफान फलंदाजी केली. पहिल्या 3 षटकांत फक्त 9 धावा काढणाऱ्या कोलकाताने पुढच्या 3 षटकांत 51 धावा काढून ईडन गार्डन्सवर धमाल केली.
मात्र, सुनील नरेनने 26 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्याला रसिक दार सलामने बाद केले. त्यांतर केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने आयपीएल 2025 चे पहिले अर्धशतक झळकावले आहे. रहाणेने २५ चेंडूत अर्धशतक ठोकून हंगामाची तुफानी सुरुवात केली. त्याला कृणाल पंड्याने माघारी पाठवले. रहाणेने 31 चेंडूत 56 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार लगावले.
नरेन नंतर केकेआरचा उपकर्णधार व्यंकटेश अय्यर फार काही खास करू शकला नाही. तो कृणाल पांड्यांचा शिकार ठरला. त्याला 7 चेंडूत 6 धावाच करता आल्या. त्यांनंतर रिंकू सिंग आपली जादू दाखवू शकला नाही. 10 चेंडूत 12 धावा करत तो कृणाल पांड्यांचा बळी ठरला. मग अंगकृष रघुवंशीने डाव सांभाळत 22 चेंडूत तडकाफडकी 30 धावा केल्या. त्याला यश दयालने बाद केले. सर्वांना अपेक्षा असलेला आंद्रे रसेलही आपली कमाल दाखवू शकला नाही. तो सुयश शर्माच्या बॉलवर बाद झाला. हर्षित राणा( 6 चेंडू 5 धावा) लवकर बाद झाला. रमणदीप सिंग (6 धावा) आणि स्पेन्सर जॉन्सन (1 धाव) नाबाद राहिले.
आरसीबीकडून कृणाल पांड्यांने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यासाठी त्याला 29 धावा मोजाव्या लागल्या. जोश हेझलवूडने 22 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या. तर यश दयाल, रसिक दार सलाम आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.
आरसीबीचा प्लेइंग 11
विराट कोहली, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल
केकेआरचा प्लेइंग 11
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती