फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मोहम्मद शामीचे पुनरागमन : भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे, टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ नोव्हेंबरपासून सामने खेळणार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या १८ खेळाडूंची घोषणा केली आहे. यामध्ये भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीचा संघामध्ये समावेश नव्हता त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या सोशल मीडियावर बीसीसीआयला प्रश्न केले होते. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला असून मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
जवळपास वर्षभरानंतर तो व्यावसायिक सामने खेळताना दिसणार आहे. त्याने 19 नोव्हेंबर 2023 रोजी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो एकही देशांतर्गत सामना खेळू शकला नाही. मात्र, आता त्याला रणजी ट्रॉफीमध्ये संधी मिळणार असून बुधवारी 13 नोव्हेंबरला तो मैदानात दिसणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा – ऑस्ट्रेलियन मीडियाला लागली भारताची भुरळ; हिंदी-पंजाबीमध्येही करणार कसोटी मालिकेचे कव्हरेज
मोहम्मद शामी बुधवारपासून मध्य प्रदेश विरुद्धच्या रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप सी सामन्यात इंदूरच्या मैदानावर आपली ताकद दाखवताना दिसणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट आणि बंगाल रणजी ट्रॉफीसाठी ही चांगली गोष्ट आहे की मोहम्मद शामी पुनरागमन करणार आहे. तो बुधवारपासून इंदूरमध्ये यजमान मध्य प्रदेशविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी सामन्यात खेळणार आहे. शामी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळणारा तो मध्य प्रदेशविरुद्ध संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल.
बंगाल क्रिकेट असोसिएशनने पुढे सांगितले की, “बंगाल संघात शामीचा समावेश करणे संघासाठी खूप फायदेशीर ठरेल. बंगाल संघ रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.” बंगालचा संघ सध्या चार सामन्यांनंतर 8 गुण मिळवून आपल्या गटात पाचव्या स्थानावर आहे. शामीला फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे आणि तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी संघात त्याची निवड होऊ शकते. सलग दोन रणजी सामने खेळून आणि दीर्घ स्पेल टाकून त्याने फिटनेस आणि कामाचा ताण सांभाळला तर तो ऑस्ट्रेलियातही शेवटचे तीन सामने खेळू शकतो.
हेदेखील वाचा – चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात भारतीय ब्लाईंड क्रिकेट संघाला पाकिस्तान दौऱ्यासाठी मिळाली NOC; क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.