यूएई : आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत हाँगकाँगचा दारुण पराभव करत पाकिस्तानने सुपर ४ मध्ये एंट्री मिळवली आहे. अ गटातून भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) हे दोन संघ सुपर ४ मध्ये पोहोचले असून ४ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज क्रिकेट सामना पहायला मिळणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की सर्वच क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेचा समजला जातो. आशिया कपच्या ग्रुप स्टेज मध्ये झालेल्या भारत पाक सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला होता. आता रविवारी दोन्ही संघांमध्ये रंगणाऱ्या सुपर ४ सामन्यात कोणी बाजी मारणार हे पहाणं औसुक्याच ठरणार आहे.
असं आहे सुपर-४ सामन्यांच वेळापत्रक :
1) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका – ३ सप्टेंबर २०२२
2) भारत विरुद्ध पाकिस्तान – ४ सप्टेंबर २०२२
3) भारत विरुद्ध श्रीलंका- ६ सप्टेंबर २०२२
4) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान – ७ सप्टेंबर २०२२
5) भारत विरुद्ध अफगाणिस्तान- ८ सप्टेंबर २०२२
6) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान – ९ सप्टेंबर २०२२