नईम हसनला पोलिसांनी केली मारहाण (फोटो- ians)
पोलिसांनी बांगलादेशी क्रिकेटपटू नईम हसनला केली मारहाण
नईम हसन आहे बांग्लादेशच्या संघात फिरकीपटू
तीन पोलिस अधिकाऱ्यांवर करण्यात आई कारवाई
Naeem Hasan: सध्या बांग्लादेशचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सिरिज खेळत आहे. दरम्यान याच दरम्यान बांग्लादेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांग्लादेशी क्रिकेटपटू नईम हसन याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. त्याला पोलिसांनी मारहाण केली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
बांग्लादेशी क्रिकेटपटू नईम हसनसोबत मारहाणीची घटना घडली आहे. त्याला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. आता या प्रकरणी कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बांग्लादेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे त्याबाबत जाणून घेऊयात.
नेमके प्रकरण काय आहे?
१२ जून रोजी २६ वर्षीय टेस्ट स्पिनर नईम हसन ढाका प्रीमियर लीगचा सामना खेळून एअरपोर्टवरुन आपल्या घरी परतत होता. त्यावेळेस पोलिसांनी त्याची रिक्षा अडवल्याचे समोर येत आहे. पोलिसांना त्याबाबत विचारणा केली असताना त्यांनी आक्रमकपणा घेतला. त्यावर नईम हसनने असा आरोप केला आहे की, पोलिसांवर त्याचा गळा पकडून त्याला जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आणि लाठ्या-काठ्या व प्लास्टिक पाइपचा वापर करून अमानुष मारहाण केली. आपण ‘राष्ट्रीय क्रिकेटपटू’ असल्याचे वारंवार सांगूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्याने केला आहे.
‘तू तुझे काम…’; Kane Williamson च्या निवृत्तीवर Virat Kohli भावुक; शेअर केली खास पोस्ट
ही घटना समोर येताच क्रिकेट विश्वात तीव्र संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या घटनेतील दोन पोलिसांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. सर्व खेळाडूंनी नईम हसनच्या पाठीशी उभे राहत या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘मल्लखांब लव’ च्या संकल्पनेतून मराठी कलावंतांसह आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा होणार
बांगलादेशातील क्रिकेटपटू नईम हसन याला झालेल्या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेत चटगाव प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या प्रकरणात आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोणाचेही गैरवर्तन किंवा मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






