फोटो सौजन्य - X
Rohit Sharma inaugurates stand built at Wankhede ground : भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकताच कसोटी क्रिकेटमधून अलविदा केला आणि सर्वांनाच त्याचा धक्का बसला. पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे त्याआधीच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. आयपीएल पुन्हा एकदा 17 मे पासून सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि संघाचा दमदार फलंदाज रोहित शर्मा यांच्या नावाचे स्टॅन्ड त्याच्या होम ग्राउंडवर म्हणजेच वानखेडेवर तयार करण्यात आले आहे. वानखेडेवर तयार करण्यात आलेल्या स्टँडचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते शरद पवार यांचे उपस्थितीत या स्टॅन्डचे उद्घाटन करण्यात आले.
आजच्या या उद्घाटन समारंभाला त्याचे आई वडील त्याचबरोबर त्याची पत्नीदेखील त्याचा भाऊ आणि त्याच्या भावाची पत्नी तेथे मैदानावर उपस्थित होते. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या आई वडील उद्घाटन करण्यासाठी सांगितले. आजच्या या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते शरद पवार हे देखील उपस्थित राहून त्यांनी रोहित शर्माचा सत्कार केला.
THE BOY CAME FROM NOTHING TO CONQUERING WORLD CRICKET. 🙇
– Rohit Sharma, Stand at Wankhede. pic.twitter.com/0PwKwYvamR
— Johns. (@CricCrazyJohns) May 16, 2025
उद्घाटन झाल्यानंतर रोहित शर्माने भाषण केले आणि यामध्ये त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीचे आभार मानले. भाषण करताना रोहित म्हणाल की, जे काही आज घडले आहे ते मी स्वप्नात देखील पाहिले नव्हते. जेव्हा मी मोठा होत होतो, तेव्हा माझे स्वप्न होते की मुंबईसाठी आणि भारतासाठी क्रिकेट खेळणे. याबद्दल मी कधीच विचार केला नव्हता. माझ्यासाठी नेहमीच ज्याप्रकारे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि स्वत: कडून जेवढे चांगले होईल ते करण्याचा मी प्रयत्न केला. भारतासाठी चांगला खेळ दाखवण्याचा आणि खेळण्याचा प्रयत्न केला.
RCB vs KKR : ‘निवृत्ती’नंतर मैदानावर दिसणार विराट कोहली, बंगळुरू मयंक अग्रवालवर विश्वास ठेवेल का?
पुढे तो म्हणाला की, हे सगळ करत असताना तुम्ही बरच काही साध्य करता, तुमच्या नावावर अनेक विक्रम नोंदवता. पण आज जे काही घडले ते माझ्यासाठी खास आहे. त्याचे एक कारण म्हणजेच वानखेडे हे ऐतिहासिक मैदान आहे. त्याचबरोबर या मैदानावर अनेक आठवणी आहेत. स्वतःचे नाव एवढ्या मोठा दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या यादीमध्ये सामील झाले यासाठी मी सर्वांचाच आभारी आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांचे आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचे देखील आभार मानले.