फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन समारंभासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येत नसल्याच्या वृत्तावर पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की ते बीसीसीआयमुळे पाकिस्तानमध्ये येत नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा आणि कॅप्टन्स डे १६ किंवा १७ फेब्रुवारीला होणार आहे. रोहित शर्माही कॅप्टनच्या फोटोशूटसाठी पाकिस्तानला जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र अजुनपर्यत काहीच स्पष्ट झालेले नाही. पीसीबीच्या अधिकाऱ्यानेही बीसीसीआय खेळात राजकारण आणत असल्याचे म्हटले आहे.
टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामने दुबईत खेळणार आहे, जिथे २० फेब्रुवारीला बांगलादेश, २३ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध लीग सामने खेळणार आहेत. भारत उपांत्य फेरीचा सामनाही दुबईत खेळणार असून जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामना लाहोरऐवजी दुबईत होणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, अलीकडेच पाकिस्तानला भेट दिलेल्या आयसीसी शिष्टमंडळाचा भाग असलेल्या तीन भारतीय नागरिकांना जागतिक संस्थेने त्यांची नावे पीसीबीकडे पाठवल्यानंतर लगेचच त्यांना व्हिसा देण्यात आला.
India vs England : जिओ सिनेमावर नाही..IND vs ENG T20 मालिका केव्हा, कुठे पाहता येणार?
सूत्राने सांगितले की पीसीबीने स्पर्धेपूर्वीच्या कार्यक्रमांसाठी येथे येणाऱ्या सर्व कर्णधार, खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांना तात्काळ व्हिसा देण्यासाठी सरकारकडून सर्व संबंधित मान्यता मिळवल्या आहेत. “यामध्ये रोहित किंवा इतर कोणत्याही भारतीय संघातील खेळाडू किंवा अधिकारी किंवा बोर्डाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे,” तो म्हणाला. पीटीआयला आणखी एका स्रोताने पुष्टी दिली की पीसीबीने आयसीसीला हे स्पष्ट केले आहे की उद्घाटन समारंभ, ज्यामध्ये सर्व संघ आणि त्यांचे कर्णधार यांचा समावेश असेल, पाकिस्तानमध्ये होईल.
“हे सामान्य प्रोटोकॉलनुसार आहेत आणि उद्घाटन सामना १९ तारखेला असल्याने, उद्घाटन समारंभ १६ किंवा १७ तारखेला होणे अपेक्षित आहे,” सूत्राने सांगितले. सराव सामन्यांच्या वेळापत्रकावर उद्घाटन सोहळ्याचे वेळापत्रक अवलंबून असेल, असे ते म्हणाले. दरम्यान, बीसीसीआयने रोहितला पाकिस्तानात पाठवण्याची शक्यता नाकारली नाही किंवा त्याच्या प्रवासाची पुष्टी केली नाही. तथापि, भारतीय संघ आपल्या स्पर्धेच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव घालणार नसल्याच्या वृत्तावर पीसीबीच्या अधिकाऱ्याने निराशा व्यक्त केली .
“बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे, जे खेळासाठी अजिबात चांगले नाही. त्यांनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. त्यांच्या कर्णधाराने उद्घाटन समारंभासाठी पाकिस्तानला जावे अशी त्यांची इच्छा आहे,” पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी आयएएनएसला सांगितले. आता अशा बातम्या येत आहेत की त्यांच्या जर्सीवर यजमान देशाचे (पाकिस्तान) नाव छापले जाऊ नये असे आम्हाला वाटते आणि आम्हाला विश्वास आहे की जागतिक प्रशासकीय संस्था (ICC) असे होऊ देणार नाही आणि पाकिस्तानला पाठिंबा देईल.