सौजन्य - gautamgambhir55 and rickyponting Border Gavaskar Trophy 2024 : ते अजूनही घाबरलेले आणि बुजलेले; अखेर रिकी पॅाटींगचे गौतम गंभीरला जोरदार प्रत्त्युत्तर
Ricky Ponting Reaction on Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष सध्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंग यांच्यातील तणावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिकी पाँटिंग म्हणतो की टीम इंडिया नुकताच न्यूझीलंडकडून 3-0 असा पराभूत झाला आहे आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर घाबरले आहेत.
आपल्या देशाच्या संघावर लक्ष केंद्रित
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात तिथून झाली जेव्हा ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीर पत्रकार परिषदेत म्हणाले की, रिकी पाँटिंगने भारतीय क्रिकेटऐवजी आपल्या देशाच्या संघावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वास्तविक, गंभीरच्या वक्तव्यापूर्वी रिकी पॉन्टिंगने न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या 3-0 अशा पराभवावर चिंता व्यक्त केली होती. याशिवाय विराट कोहलीने गेल्या 5 वर्षांत केवळ दोनच कसोटी शतके झळकावल्याचेही त्याने नमूद केले. पत्रकार परिषदेत गौतम गंभीरसमोर हा आकडा मांडला असता त्याने पाँटिंगवर जोरदार हल्ला चढवला.
गौतम गंभीर घाबरला…
आता एका पॉडकास्टवर चर्चा करताना रिकी पाँटिंगने गौतम गंभीरच्या वक्तव्यावर पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. तसेच विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलताना तो म्हणाला की, घरच्या मैदानावर त्याची सरासरी 90 वरून 30 वर घसरली आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विराटचा विक्रम खूप चांगला असल्याने विराट आपल्या टीकाकारांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होईल, अशी आशा ऑस्ट्रेलियन दिग्गजाने व्यक्त केली.
पॉन्टिंगने गंभीरवर मारला टोमणा
रिकी पाँटिंग म्हणाला, “न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. मला असे समजले की तो घाबरलेला आणि बुजलेला आहे. आम्ही याआधीही आमने-सामने आलो आहोत, पण यावेळी त्याने संधी पाहिली आणि मला टोमणे मारले. दरम्यान, पॉन्टिंगने गंभीरसाठी ‘प्रिकली’ हा इंग्रजी शब्दही वापरला आहे, ज्याचा हिंदीत अर्थ असा होतो की ज्याला खूप लवकर राग येतो किंवा जो नेहमी रागावतो.
काय म्हणाला होता गौतम गंभीर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी, आज म्हणजेच सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यादरम्यान त्यांनी पाँटिंगला जोरदार उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने अलीकडेच विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केला होता आणि म्हणाला होता की, मी विराटबद्दल एक आकडेवारी वाचली, त्यात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत त्याने केवळ दोन (तीन) कसोटी शतके झळकावली आहेत, हे खरे आहे. तसे दिसत नाही पण तसे असेल तर ही चिंतेची बाब आहे.
पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध?
मागील पाच वर्षात केवळ दोनच कसोटी शतके झळकावणारा जगातला एकही अव्वल दर्जाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नसेल. गौतम गंभीरला पाँटिंगने केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा. रोहित आणि विराट हे कमालीचे बलवान खेळाडू आहेत.
हेही वाचा : Gautam Gambhir : पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? ट्रोलर्सला कोच गंभीरने दिले सडेतोड उत्तर
हेही वाचा : पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड! मार्को जान्सनने काढली खुन्नस, दोन वेळा संजू सॅमसनला केलेयं त्रिफळाचित