दुसऱ्या दिवसावर दक्षिण आफ्रिकेचे पूर्ण वर्चस्व! (Photo Credit - X)
That’s stumps on Day 2! Another enthralling day’s play comes to an end 🙌#TeamIndia openers will resume proceedings tomorrow ⏳ Scorecard ▶️ https://t.co/Hu11cnqQn8#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/QDuEZyCqsF — BCCI (@BCCI) November 23, 2025
मुथुसामी-जानसेन जोडीचा भारतीय गोलंदाजांवर हल्ला
दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अक्षरशः दिवसभर ‘रडवले’. सेनुरन मुथुसामी आणि काइल वेरेयिन यांनी ८८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर, मुथुसामी यांनी आक्रमक मार्को जानसेन यांच्यासोबत ९७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सेनुरन मुथुसामीने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने दमदार १०९ धावांची शतकी खेळी केली. तर मार्को जानसेनने भारतीय गोलंदाजांवर जास्त प्रहार केला. त्याने केवळ ९३ चेंडूत ९३ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट १०२ हून अधिक होता. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार लगावले. अंतिम ४ विकेट्ससाठी दक्षिण आफ्रिकेने तब्बल २४३ धावा जोडून सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
भारतीय गोलंदाज ठरले ‘फिसड्डी’
दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी १०० पेक्षा जास्त धावा दिल्या. सर्वाधिक ४ विकेट्स कुलदीप यादव यांनी घेतल्या. तर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
भारताची फलंदाजी सुरू
४८९ धावांच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी भारतीय संघाने फलंदाजी सुरू केली. सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी ६.१ षटके खेळून काढत संघाला कोणताही धक्का बसू दिला नाही. खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल ७, तर केएल राहुल २ धावांवर नाबाद होते. भारतीय संघ अजूनही ४८० धावांनी पिछाडीवर असून, तिसरा दिवस टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.






