Chemical Leak: कॅलिफोर्नियामध्ये धोकादायक रासायनिक गळती; 40,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे गंभीर आदेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
California Chemical Leak May 2026 : अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामधील (California) एका एरोस्पेस प्लास्टिक कारखान्यात झालेल्या भीषण रासायनिक गळतीमुळे (Chemical Leak) संपूर्ण परिसरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवेत पसरणाऱ्या विषारी वाफेमुळे आणि महाभयंकर स्फोटाच्या भीतीने प्रशासनाने तातडीने सुमारे ४०,००० नागरिकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे कडक आदेश जारी केले आहेत. या वाढत्या धोक्यामुळे मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बाधित भागातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत.
ऑरेंज काउंटी अग्निशमन विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही भयानक घटना गार्डन ग्रोव्ह (Garden Grove) येथील ‘जीकेएन एरोस्पेस’ (GKN Aerospace) या कारखान्यात घडली. हा कारखाना व्यावसायिक आणि लष्करी विमानांसाठी लागणारे महत्त्वाचे सुटे भाग आणि प्लास्टिकचे घटक तयार करतो. गुरुवारी कारखान्यातील एका विशाल साठवण टाकीमध्ये (Storage Tank) तांत्रिक बिघाड झाला. या टाकीत तब्बल २२,७०० ते २६,५०० लिटर ‘मिथाइल मेथॅक्रिलेट’ (Methyl Methacrylate) हे अत्यंत धोकादायक आणि ज्वलनशील रासायनिक द्रव्य भरलेले होते. अचानक ही टाकी प्रमाणाबाहेर गरम झाली आणि त्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे विषारी वाफ वेगाने हवेत पसरू लागली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hamza Burhan: पुलवामाचा हिशोब चुकता? हल्ल्याचा सूत्रधार अज्ञातांनी संपवला; अंत्यविधीसाठी प्रमुख शस्त्रास्त्रांसह दाखल
गार्डन ग्रोव्हचे अग्निशमन प्रमुख क्रेग कोवे यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, रासायनिक प्रक्रियेमुळे ही टाकी इतकी गरम झाली आहे की ती कोणत्याही क्षणी फुटू शकते किंवा तिला मोठे तडे जाऊ शकतात. जर असे झाले, तर हे प्राणघातक रसायन मोठ्या प्रमाणावर जमिनीवर सांडेल आणि हवेच्या संपर्कात येताच तिथे एक मोठा आणि विनाशकारी स्फोट होईल. रात्रभर प्रयत्न करूनही ही गळती आणि उष्णता नियंत्रित करण्यात बचाव पथकांना यश आलेले नाही. त्यामुळे आधी केवळ गार्डन ग्रोव्ह पुरता मर्यादित असलेला स्थलांतराचा आदेश आता शेजारील सायप्रस, स्टॅन्टन, अनाहिम, बुएना पार्क आणि वेस्टमिन्स्टर या आणखी ५ शहरांमधील काही भागांमध्ये वाढवण्यात आला आहे.
Garden Grove right now: a toxic chemical tank at an aerospace plant is failing. Crews can’t stop it. Fire chief says it either leaks out or explodes. 40,000 people evacuated across six cities. The plant makes military aircraft parts. California regulates plastic straws but not… pic.twitter.com/kzZsdQ2snR — IredcapI (@IredcapI) May 23, 2026
credit – social media and Twitter
मिथाइल मेथॅक्रिलेट हे प्रामुख्याने अॅक्रेलिक प्लास्टिक, रेझिन्स आणि विमानांचे सुटे भाग बनवण्यासाठी वापरले जाणारे एक अत्यंत अस्थिर रासायनिक द्रव्य आहे. हे रसायन केवळ ज्वलनशीलच नाही, तर त्याचे बाष्पीभवन होऊन हवेत पसरलेली वाफ मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असते. या वाफेमुळे डोळे, त्वचा आणि श्वसनसंस्थेला तीव्र जळजळ होऊ शकते. तसेच जास्त प्रमाणात हा वायू शरीरात गेल्यास माणूस बेशुद्ध पडू शकतो. यामुळेच प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि आदेश मिळालेल्या भागातील लोकांना कोणतीही दिरंगाई न करता सुरक्षित छावण्यांमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NPT 2026 : अमेरिका-इराण वाद विकोपाला; संयुक्त राष्ट्रांमधील महाचर्चा सलग तिसऱ्यांदा फ्लॉप, इराणचा थेट अण्वस्त्रांचा इशारा
सध्या घटनास्थळी ऑरेंज काउंटीचे अग्निशामक दल, घातक पदार्थ नियंत्रण पथक (Hazmat Team) आणि स्थानिक पोलीस यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहेत. टाकीचे तापमान कमी करण्यासाठी आणि विषारी वायूचा प्रसार रोखण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, पुढील काही तास या मोहिमेसाठी अत्यंत गंभीर आहेत. जर ही गळती वेहिलेत रोखता आली नाही, तर होणारा स्फोट संपूर्ण औद्योगिक वसाहतीला कचाट्यात घेऊ शकतो. डच आणि अमेरिकन माध्यमांचे या घटनेवर बारीक लक्ष असून संपूर्ण कॅलिफोर्नियात सध्या भीतीचे सावट आहे.
Ans: दक्षिण कॅलिफोर्नियातील एरोस्पेस कारखान्यात 'मिथाइल मेथॅक्रिलेट' (Methyl Methacrylate) या अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक रसायनाची गळती झाली आहे.
Ans: भीषण स्फोटाचा आणि विषारी वायूचा धोका लक्षात घेऊन सुमारे ४०,००० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Ans: ही मुख्य घटना गार्डन ग्रोव्ह येथील जीकेएन एरोस्पेस कारखान्यात घडली असून, याचा फटका सायप्रस, अनाहिम आणि वेस्टमिन्स्टरसह ६ शहरांना बसला आहे.






