काव्या मारनचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर काव्या मारनची प्रतिक्रिया व्हायरल
एसआरएचने आरसीबीवर मिळवला 55 रन्सने विजय
कृणाल पंड्याची गोलंदाजी आयपीएलमधील चर्चेचा विषय
Tata IPL SRH Vs RCB Krunal Pandya: काल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात एसआरएचने आरसीबीवर 55 रन्सने विजय मिळवला आहे. कालचा सामना एसआरएचसाठी अत्यंत महत्वाचा होता. एसआरएचने सामना जिंकला तरी देखील त्यांना टॉप 2 मध्ये जाता आले नाही. मात्र या सामन्यात एसआरएचची मालकीण काव्या मारनच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
22 मे रोजी आरसीबी आणि एसआरएचमध्ये सामना खेळवला गेला आहे. एसआरएचने आरसीबीचा 55 रन्सने पराभव केला. सामना सुरू असताना स्टँड्समध्ये बसलेल्या हैदराबादच्या मालकीण एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हैदराबादचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता दूसरा क्वालिफायर सामना हैदराबाद कोणाविरुद्ध खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Like many have questioned before, Kavya Maran also looks uncertain about Krunal Pandya's action. How is he generating that much bounce without chucking? His action should be checked if RCB is qualified for the finals pic.twitter.com/1BWRhPfjqY — Brutal Truth (@sarkarstix) May 22, 2026
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत एसआरएचच्या मालकीण काव्या मारन या काहीशा रागात आणि गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. सामन्यादरम्यान क्रुणाल पांड्या गोलंदाजी करत असताना त्याच्या ‘बॉलिंग ॲक्शन’वरून काव्या मारन नाराज झाल्याचे दिसून आले. त्याची गोलंदाजी पाहून मारन यांनी स्टँड्समध्ये त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना क्रुणालच्या ॲक्शनबाबत प्रश्न विचारत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
IPL 2026: Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला? हैदराबाद अद्याप वेटिंगवर
Qualifier-1मध्ये RCB vs GT; फायनलचे तिकीट कोणाला?
आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात साखळी सामने संपणार आहेत. तर पुढील आठवड्यापासून म्हणजेच 26 मे पासून प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. आतापर्यंत आरसीबी, गुजरात टायटन्स आणि एसआरएच या संघांनी क्वालिफाय केले आहे. तर अद्याप एक संघ टॉप 4 मध्ये येणे बाकी आहे. पहिली क्वालिफायर 1 आरसीबी आणि गुजरातमध्ये होणार आहे.आयपीएल 2026 मध्ये टॉप 2 चे संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आहेत. 26 मे रोजी हिमाचल प्रदेशच्या धरमशाळा येथील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे. त्यातून जिंकणारा संघ फायनलमध्ये पोचणार आहे. तर हारणाऱ्य संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.
काल आरसीबी विरुद्ध एसआरएचमध्ये सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीचा 55 रन्सने पराभव झाला आहे. तरी देखील आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मात्र एसआरएचला कालचा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक होते. तसे झाले असते तर एसआरएच दुसऱ्या म्हणजेच गुजरातच्या स्थानी पोचली असती. मात्र एसआरएचला त्या फरकाने सामना जिंकता आला नाही. त्यामुळे एसआरएच तिसऱ्या स्थानावर आहे.






