वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास! (Photo Credit- X)
ICC T20 Rankings: भारताचासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरणारा वरुण चक्रवर्तीसाठी (Varun Chakaravarthy)आशिया कपमध्ये एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या टी-२० रँकिंगमध्ये तो जगातील नंबर १ गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई नंतर, टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा तो तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या जेकब डफीला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. वरुण चक्रवर्ती ७३३ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर जेकब डफी ७१७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, रवी बिश्नोई टी-२० क्रमवारीत टॉप १० मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे. बिश्नोई आता ८ व्या स्थानावर आहे. याशिवाय, अक्षर पटेल १२ व्या क्रमांकावर आहे. फिरकीपटू कुलदीप यादवनेही चांगली कामगिरी करत १६ स्थानांनी मोठी झेप घेतली असून, तो ६०४ रेटिंग गुणांसह २३ व्या स्थानावर पोहोचला आहे.
🚨 VARUN CHAKRAVARTHY – THE NEW NO.1 RANKED T20I BOWLER. 🚨
– The magic of Varun CV. 🇮🇳🔥 pic.twitter.com/KBMIIkC5Qo
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2025
टी-२० मध्ये नंबर १ रँकिंगवर पोहोचणे ही वरुण चक्रवर्तीसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे. हा विक्रम करणारा तो तामिळनाडूचा पहिला खेळाडू आहे. त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१२ मध्ये पदार्पण केले. आतापर्यंत २० टी-२० सामने खेळताना त्याने ३५ विकेट्स घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीचा इकॉनॉमी रेट फक्त ६.८३ आहे आणि त्याने दोन वेळा ५-बळी घेण्याची कामगिरी केली आहे.
आशिया कपमध्ये वरुण चक्रवर्ती टीम इंडियासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरला आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये फक्त दोन विकेट्स घेतल्या असल्या तरी, त्याचा इकॉनॉमी रेट उत्तम राहिला आहे. विशेष म्हणजे तो पॉवरप्लेपासून ते डेथ ओव्हर्सपर्यंत कोणत्याही टप्प्यात गोलंदाजी करू शकतो. दुबई आणि अबू धाबी येथील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्यामुळे वरुण तेथे प्रभावी कामगिरी करू शकतो. कुलदीप यादवनेही गेल्या दोन सामन्यांत दोन सामन्यांमध्ये सात विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे.
आयसीसी टी-२० अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा हार्दिक पंड्या पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या क्रमवारीतही भारत अव्वल स्थानी आहे. अभिषेक शर्मा ८८४ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या यादीत तिलक वर्मा दोन स्थानांनी घसरून चौथ्या स्थानावर आला आहे, तर सूर्यकुमार यादव सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे.