फोटो सौजन्य - ICC
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : T-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलच्या लढतीत भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. आजचा हा महामुकाबला बार्बाडोसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल. भारताच्या संघाने शेवटचा T-२० विश्वचषक २००७ मध्ये जिंकला होता. आता भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करत आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने अजुनपर्यत एकही सामना गमावलेला नाही. परंतु बार्बाडोसमधील हवामानाची अपडेट समोर आली आहे. असे म्हंटले जात आहे की, बार्बाडोस सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जर पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला तर या सामन्याचा निकाल कसा जाहीर होणार? कोणत्या संघाला विजयी घोषित करणार असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री आज वाजता सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी जर पाऊस पडला तर नाणेफेक साठी उशीर होऊ शकतो. परंतु या सामन्याची महत्वाची बाब म्हणजेच अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, नियोजित तारखेला कोणतीही शक्यता नसतानाच सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना जर नियोजित वेळेमध्ये झाला नाही तर किमान १० षटकांचा सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी हे शक्य नसेल, तर सामना राखीव दिवशी म्हणजेच रविवारी खेळवला जाईल. त्यामुळे चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही. टीम इंडिया खूप मजबूत स्थितीत आहे. यावेळी त्याने T२० विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्माही फॉर्मात आहे. गेल्या दोन सामन्यांत त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियासाठी तणावाचा विषय बनू शकतो. सलामीवीर म्हणून कोहली अजून काही विशेष करू शकलेला नाही. रोहित आणि कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली सुरुवात केल्यास संघ मोठी धावसंख्या करू शकतो.