Apple WWDC 2026: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल
खंर तर यावेळी कंपनीने त्यांच्या ईव्हेंटमधील फोकस अॅपल इंटेलिजेंस आणि सिरी एआयवर ठेवला होता. मात्र नव्या ऑडियो कंट्रोल्समुळे आयफोन यूजर्सची जुनी कमतरता दूर केली आहे. आता यूजर्स वेगवेगळे अलर्ट्स आणि नोटिफिकेशन्सच्या आवाजावर अधिक चांगला कंट्रोल मिळवू शकणार आहेत.
एका रिपोर्टनुसार, हे नवीन कंट्रोल्स सेटिंग अॅपमध्ये साऊंड अँड हॅप्टिक्स सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. यूजर आता रिंगटोन, अलार्म आणि टाइमरसोबतच अलर्ट आणि सिस्टिम साऊंडसाठी वेगवेगळे वॉल्यूम लेवल सेट करू शकता. आतापर्यंत, आयफोन यूजर्सना अनेक प्रकारच्या नोटिफिकेशन्स आणि अलर्ट्ससाठी एकाच सेटिंगवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे, इतर श्रेणींवर परिणाम न होऊ देता एखाद्या श्रेणीचा आवाज कमी किंवा जास्त करणे अनेकदा कठीण जायचे. मात्र आता यूजर्सची समस्या सुटणार आहे.
असं सांगितलं जात आहे की, अॅपलने यामध्ये एक मॅच रिंगटोन वॉल्यूम पर्याय देखील देण्यात आला आहे. जेव्हा हा पर्याय ऑन असतो, तेव्हा आयओएस पूर्वीप्रमाणेच एक कॉमन वॉल्यूम सेटिंगचा वापर करणार आहे. मात्र हा पर्याय बंद करताच यूजर्स अलार्म, टाइमर, अलर्ट आणि सिस्टिम साउंडसाठी पूर्णपणे वेगवेगळा ऑडिओ वापरू शकणार आहेत. टेक कंपनीचं असं म्हणणं आहे की, अलार्म आणि टाइमर कंट्रोल ‘वेक-अप’ अलार्म आणि काही इतर खास अलार्म्सवर लागू होणार नाही, ज्यामध्ये आधीपासूनच वेगळी वॉल्यूम सेटिंग्स मिळते.
अॅपलने स्पष्ट केलं आहे की, अलर्ट आणि सिस्टिम साउंड कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मेसेज नोटिफिकेशन्ससोबतच कीबोर्ड क्लिक, कॅमेरा शटर इफेक्ट आणि अशा प्रकारचे दूसरे सिस्टिम ऑडियो समाविष्ट आहेत. हे नवीन कंट्रोल्स कोणत्याही एका सिंगल अलार्मवर लागू होत नाहीत. याऐवजी, यूजर्स ब्रॉडर साउंड कॅटेगरीज स्वतंत्रपणे अॅडजस्ट करू शकतात. हे आयओएसच्या मागील वर्जनच्या तुलनेत अधिक जास्त फ्लेक्सिबिलिटी देते. हा बदल आयफोन अँड्रॉइडच्या पद्धतीच्या खूप जवळ आला आहे, जिथे अलार्म, नोटिफिकेशन्स, रिंगटोन आणि मीडिया प्लेबॅकसाठी स्वतंत्र नियंत्रणे अनेक वर्षांपासून एक स्टँडर्ड फीचर आहेत.






