आकर्षक डिझाईन्स बनवण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही... Canva ने रोलआउट केलं नवं 'Offline' फीचर, असं करणार काम
Apple Watch यूजर्ससाठी खुशखबर! Telegram ने लाँच केल खास अॅप; QR कोड स्कॅन करताच मिळणार अॅक्सेस
कंपनीने सांगितलं आहे की, याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या ग्लोबल यूजर कम्युनिटीची सर्वाधिक मागणी असलेली क्षमता उपलब्ध केली आहे. नवीन फीचर ऑफलाइन मोडमध्ये यूजर्सना ट्रॅवलिंग, कम्यूटिंग, क्लासेज अटेंड करणं किंवा खराब कनेक्टिविटी असलेल्या ठिकाणी देखील प्रोजेक्ट्सवर काम करण्याची सुविधा देणार आहे. हे फीचर विशेषत: मोबाइल-फर्स्ट यूजर्स, विद्यार्थी, टीचर्स, उद्योजक आणि प्रोफेशनल्ससाठी तयार करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एका प्रेस नोटमध्ये कॅनव्हाने सांगितलं आहे की, हे नवीनल फीचर डेव्हलप करण्याचे उदिष्ट असे आहे की, इंटरनेट कनेक्टिविटीमुळे कधीही क्रिएटिविटी आणि प्रोडक्टिविटीमध्ये अडथळे बनू नयेत. याची पहिली घोषणा या वर्षाच्या सुरुवातीला कॅनव्हा क्रिएट ईव्हेंटमध्ये करण्यात आली होती आणि आता अखेर हे फीचर यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे.
कंपनीने सांगितलं आहे की, यूजर्स ऑफलाइन अॅक्सेससाठी त्यांचे डिझाईन सेव्ह करू शकणार आहेत. यूजर्स कोणत्याही अॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील सपोर्टेड डिव्हाईस आणि फॉर्मेट्सवर एडीटींग सुरु ठेऊ शकणार आहेत. ऑफलाईन करण्यात आलेले सर्व बदल इंटरनेट परत येताच ऑटोमॅटिकली सिंक होणार आहेत. हे फीचर सर्व कॅनव्हा यूजर्ससाठी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उपलब्ध आहेत. कॅनव्हाने सांगितलं आहे की, ऑफलाइन सपोर्ट इनेबल केल्यानंतर यूजर्स इंटरनेटशिवाय 14 दिवसांसाठी डिझाईन्स क्रिएट आणि एडीट करू शकणार आहेत. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना इंटरनेट कनेक्टिव्हिटी जाण्यापूर्वी त्यांच्या डिझाईनवर दिलेले मेक अवेलेबल ऑफलाईन ऑप्शन निवडावे लागणार आहे.
याशिवाय, कंपनीने भारताला आपल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक म्हणून संबोधले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ऑफलाइन मोड मोबाइल-फर्स्ट यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले आहे. या रोलआऊटबाबत भाष्य करताना कॅनव्हाचे ग्लोबल हेड ऑफ प्रोडक्ट, रोब कावाल्स्की यांनी सांगितलं की, ऑफलाइन मोड भारताच्या आजच्या कार्यशैलीप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे मोबाइल-फर्स्ट, नेहमी सक्रिय आणि कल्पनांनी परिपूर्ण आहे. हे रोलआऊट अलीकडेच गुगल जेमिनीने लाँच केलेल्या कॅनव्हा कनेक्टेड अॅपनतंर करण्यात आले आहे. जेमिनीमध्ये तयार करणण्यात आलेले डिझाईन्स थेट कॅनव्हा एडीटरमध्ये एडीट केले जाऊ शकतात.






