डिझाईन पाहताच प्रेमात पडाल... 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन तीन रंग आणि दोन रॅम व स्टोरेज पर्याय लाँच केला आहे. विशेष म्हणजेच, स्मार्टफोनच्या मागील बाजूला कस्टमाइजेबल ‘अलाइव मॅट्रिक्स डिस्प्ले’ देखील मिळणार आहे, जो वेगवेगळ्या अॅप्सचे नोटिफिकेशन दर्शवतो. याशिवाय, कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेट देखील मिळणार आहे.
मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, ‘या’ ठिकाणाची केली निवड
कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन 6GB+128GB आणि 8GB+128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन व्हाइट, प्लाज्मा ऑरेंज आणि टर्मिनल ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकणार आहेत. स्मार्टफोनची विक्री लवकरच फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – TECNO)
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट वाला 6.76-इंच फुल-एचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोन हाय ब्राइटनेस मोडमध्ये 950 निट्सपर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
POVA 8. Say hello to Peak Design. You can have it all:
➡️ 8000mAh* Super Power
➡️ 45W Fast Charge
➡️ 50MP Sony LYTIA 600 Camera
➡️ 2X Optical Zoom With 2K Recording
➡️ Triple Chipset With 20 5G Bands Sale starts 18 June, 12 Noon. On Flipkart and at retail stores near you.… pic.twitter.com/3x60OMs19F — POVA Mobile India (@pova_mobile) June 11, 2026
फोनमध्ये ऑक्टा-कोर 6nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर देखील मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये माली-जी610 एमसी2 जीपीयू मिळणार आहे. डिव्हाईस 6GB आणि 8GB एलपीडीडीआर5एक्स या रॅम पर्यायांनी सुसज्ज आहेत. तर स्मार्टफोन 128GB व 256GB यूएफएस 2.2 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये खास G1 आणि SE1 सिग्नल चिप देखील मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी Pova 8 मध्ये 50-मेगापिक्सेलचा सोनी एलवायटी-600 प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये एक लाइट सेंसर देखील दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये समोरील बाजूला 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. डिव्हाईसमध्ये एआय कॅमेरा, पोर्ट्रेट मोड, सुपर नाइट मोड, टाइम-लॅप्स, डुअल व्हिडीओ, व्लॉग मोड आणि स्लो मोशन सारखे अनेक दमदार फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे.
Ans: Tecno Mobile हा चीनमधील स्मार्टफोन ब्रँड असून तो Transsion Holdings चा भाग आहे.
Ans: होय, TECNO स्मार्टफोन किफायतशीर किंमत, मोठी बॅटरी आणि चांगल्या कॅमेरा फीचर्ससाठी ओळखले जातात.
Ans: होय, TECNO कडे विविध किंमत श्रेणींमध्ये 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.






