Apple Watch यूजर्ससाठी खुशखबर! Telegram ने लाँच केल खास अॅप; QR कोड स्कॅन करताच मिळणार अॅक्सेस
तसेच नव्या अॅपमुळे अॅपल वॉचमध्ये कॉन्टॅक्ट्स ब्राउज केले जाऊ शकतात, व्हॉईस मेसेज ऐकू शकतात, स्टिकर्स पाहू शकतात, जीआयएफ आणि व्हिडीओ प्ले करू शकतात आणि त्यांचे लोकेशन देखील शेअर करू शकतात. हे ॲप टेलिग्रामची बहुतेक मुख्य कार्यक्षमता ॲपल वॉचवर आणते, ज्यामुळे केवळ साध्या स्मार्टफोन नोटिफिकेशन्स प्राप्त करण्यापेक्षा खूपच चांगला वॉचओएस अनुभव मिळतो. (फोटो सौजन्य – X)
⌚️ A fully native Telegram app for Apple Watch is out. pic.twitter.com/3wSr5igssE — Pavel Durov (@durov) June 9, 2026
टेलिग्रामचे फाऊंडर आणि चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सिईओ पावेल डुरोव्ह यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, अॅपल वॉचसाठी पूर्णपणे नेटिव्ह टेलिग्राम ॲप्लिकेशन आले आहे.
पावेल डुरोव्ह यांनी घोषणा केल्यानंतर समोर आलेल्या रिपोर्टनुसार, यूजर्सना या स्मार्टवॉच अॅपद्वारे कनेक्ट करण्यासाठी सर्वात आधी त्यांच्या आयफोनमध्ये टेलिग्राम अॅप ओपन करून एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. याची सेटअप प्रोसेस पूर्णपणे तशीच आहे, ज्याप्रमाणे टेलीग्रामच्या वेब किंवा डेस्कटॉप क्लाइंट्सवर साइन-इन केले जाते. ज्या यूजर्सनी त्यांच्या अकाऊंटवर अॅडिशनल क्लाउड पासवर्ड (टू-स्टेप वेरिफिकेशन) इनेबल केले आहे, त्यांना अॅपचा अॅक्सेस मिळण्यापूर्वी व्हेरिफिकेशन स्टेप पूर्ण कराव्या लागणार आहेत.
एकदा सेटअप प्रोसेस पूर्ण झाले की, अॅपल वॉच अॅप तुमच्या सर्व संपर्क आणि जुने चॅट्स अॅक्सेस करण्याचा पर्याय देणार आहे. यानंतर यूजर्स थेट वॉचवर टेक्स्ट मेसेजेस पाठवू शकतात आणि रिसिव्ह करू शकतात, व्हॉईस मेसेज ऐकू शकतात, लोकेशन डिटेल्स शेअर करू शकतात, स्टिकर्स पाहू शकतात आणि थेट वॉच स्क्रीनवर जीआयएफ आणि व्हिडीओ देखील प्ले करू शकणार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये टेलिग्रामने अॅपल वॉच अॅप सादर केला होता. मात्र त्यानंतर हे सॉफ्टवेअर बंद करण्यात आले आणि मूळ वॉचओएस (watchOS) सपोर्ट काढून टाकण्यात आला. मात्र आता कंपनीने लेटेस्ट अपडेटसह अॅप पुन्हा एकदा लाँच केले आहे. नवीन अपडेटेड वर्जन आता त्या सर्व रीजन्समध्ये रोलआउट होणार आहे, जिथे टेलीग्राम उपलब्ध आहे.






