सावधान! भारतातील CCTV कॅमेऱ्यांच्या मोठ्या कंपन्यांवर बंदी? (Photo Credit- AI)
राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आता अधिक कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, Hikvision आणि TP-Link सारख्या चिनी कंपन्यांच्या नेटवर्क डिवायसेस आणि कॅमेऱ्यांवर लवकरच निर्बंध लावले जाऊ शकतात. विशेषतः ‘Hikvision’ या कंपनीवर चिनी सरकारचे थेट नियंत्रण असल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत, या उपकरणांच्या माध्यमातून हेरगिरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्यामुळे भारतात या चिनी कॅमेऱ्यांची मोठी बाजारपेठ आहे, परंतु हा ‘स्वस्त’ पर्याय तुमच्या गोपनीयतेसाठी महाग ठरू शकतो.
सायबर तज्ज्ञांच्या मते, अनेक परदेशी सीसीटीव्ही सिस्टिममध्ये असे सॉफ्टवेअर असते जे फुटेज थेट त्यांच्या मूळ देशातील क्लाउड सर्व्हरवर पाठवते. जर हा सर्व्हर भारताबाहेर असेल, तर तुमच्या खासगी फुटेजवर परकीयांचे नियंत्रण राहू शकते. यापूर्वी अमेरिका आणि इतर अनेक देशांनी देखील सुरक्षेच्या कारणास्तव Hikvision वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कमकुवत ‘फर्मवेअर’ किंवा ‘डिफॉल्ट सेटिंग्स’मुळे हे कॅमेरे हॅक होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
तुमची सुरक्षा आणि गोपनीयता अबाधित राखण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे:
सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरात लागलेल्या कॅमेऱ्यांबाबत सरकारने कोणतीही अधिकृत बंदी जाहीर केलेली नाही. मात्र, सरकारी कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही खरेदीबाबत अत्यंत कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. लवकरच सर्वसामान्यांसाठी देखील केंद्र सरकारकडून एखादी अॅडव्हायझरी किंवा नियमावली जारी होण्याची शक्यता आहे.






