येत्या एक-दोन दिवसांत ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार आहे. सेल सुरु झाला की, या काळात मोठ्या संख्येने लोक त्यांच्या आवडत्या वस्तू ऑर्डर करतात. जेव्हा तुम्ही देखील सेल सुरु झाल्यावर किंवा इतर वेळी देखील ऑनलाईन शॉपिंग केल्यावर पार्सल आलेले बॉक्स असेच फेकून देत असाल तर सर्वात मोठी चूक करत आहात. तुमची हीच चूक ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांना सर्वात मोठी संधी आहे. सर्वेक्षणानुसार, सेलच्या काळात सर्वात धोका वाढतो.
Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर
ऑनलाईन फ्रॉड नेमका कशामुळे होतो ?
जेव्हा लोक त्यांचे नाव, पत्ता आणि फोन नंबर असलेले लेबल लावलेले बॉक्स किंवा पाकिटे फेकून देतात, तेव्हा फ्रॉड करणारे सगळे बॉक्सेस गोळा करतात आणि लोकांची फसवणूक करतात.ते डिलिव्हरी बॉक्सवरील माहितीचा वापर करून, बनावट ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे भासवून तुमच्याशी संपर्क साधतात.आधी तुमची माहिती उघड करून तुमचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि मग तुम्हाला कॅशबॅक ऑफर्स, रिफंड क्लेम्स, बोनस रिवॉर्ड्स आणि डिस्काउंट योजनांचे आमिष दाखवतात. जर कोणी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, तर ते एक क्लेम लिंक पाठवतात, जी त्यांना एका बनावट वेबसाइटवर घेऊन जाते, जिथे ते तुमची वैयक्तिक, आर्थिक आणि बँकिंग माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील सेलच्या काळात अशा फसवणुकीचा धोका वाढतो. याचे कारण असे की, लोकांना अधिक वस्तू पोहोचवल्या जातात, ज्यामुळे घोटाळेबाजांना अधिक बॉक्सेस आणि माहिती मिळवण्याची संधी मिळते. याव्यतिरिक्त, लोकांनी आधीच वस्तू ऑर्डर केलेल्या असल्याने, ते अशा कॉल्सवर विश्वास ठेवतात. त्यामुळे, सेलच्या वेळी अशा फसवणुकी टाळणे महत्त्वाचे आहे.फसवणूक टाळण्यासाठी, या गोष्टी लक्षात ठेवा. डिलिव्हरीचे बॉक्स आणि पॅकेजेस टाकून देण्यापूर्वी, त्यावरील शिपिंग लेबल काढून टाका. जर ते निघत नसेल, तर मार्करचा वापर करून ते पूर्णपणे काळे करा, जेणेकरून तुमची माहिती कोणाच्याही हाती लागणार नाही. अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या कॉल, मेसेज आणि ईमेलवर विश्वास ठेवू नका आणि ऑफर्स किंवा डिस्काउंटच्या जाळ्यात अडकणे टाळा.






