Free Fire MAX: गेममध्ये Moco Store Live! कमी डायमंड्समध्ये मिळवा अल्ट्रा प्रिमियम रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्समध्ये मोको स्टोअर अलीकडेच लाईव्ह झाला आहे. हे स्टोअर गेममध्ये पुढील 6 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यादरम्यान प्लेअर्स स्पिन करून रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. गेमिंग कंपनी गरेनाचं असं म्हणणं आहे की, स्टोअरमुळे गेमर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. तसेच प्लेअर्सना अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून अल्ट्रा-एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)
मोको स्टोअरमधील ग्रँड प्राइज जिंकण्यासाठी, गेमर्सना किमान सहा वेळा स्पिन करावे लागेल. प्रत्येक स्पिनमुळे एक बक्षीस अनलॉक होईल, जे गेममध्ये वापरता येईल.






