काय घडलं नेमकं?
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवशक्ती मैदानावर गेल्या दीड महिन्यांपासून क्रिकेट समर कॅम्प सुरू होता. शनिवारी कॅम्पचा शेवटचा दिवस असल्याने मैदानावर खेळाडूंची मोठी गर्दी होती. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळपट्टी सपाट करण्यासाठी वापरला जाणारा जड दगडी रोलर काही अल्पवयीन मुले चालवत होती.
याचवेळी मैदानावर खेळण्यासाठी आलेल्या वीरेन चौधरीचा पाय अचानक रोलरखाली अडकला. तोल गेल्याने तो खाली पडला आणि अवजड रोलर त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातात त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
Raigad Crime: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरवर कार आदळली, दोन महिलांचा मृत्यू
उपचारापूर्वीच मृत्यू
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी वीरेनला तातडीने उपचारासाठी डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
नागरिकांमध्ये संताप
या घटनेनंतर नागरिकांनी मैदान व्यवस्थापन आणि समर कॅम्प आयोजकांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढा जड आणि धोकादायक रोलर अल्पवयीन मुलांकडे कसा सोपवण्यात आला, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. समर कॅम्पच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बार्शी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्यूनंतर ‘उत्पादन शुल्क’ला जाग, पुणे-पिंपरीतून 4 हजार 480 लिटर गावठी दारू जप्त; 52 जणांना अटक
Ans: क्रिकेट खेळपट्टीवरील जड दगडी रोलरखाली पाय अडकल्याने तो पडला आणि रोलर अंगावरून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
Ans: बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये ही घटना घडली.
Ans: या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.






