IRCTC Website Update: रेल्वे प्रवाशांना झटका! आज नाही लाँच होणार IRCTC ची नवीन वेबसाईट, काय आहे कारण? जाणून घ्या
खरं तर सुमारे एका महिन्यापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका ईव्हेंटमध्ये भाष्य करताना म्हटलं होतं की, 15 जुलै रोजी आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट लाँच केली जाणार आहे. रेल्वे मंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर नव्या वेबसाईटबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता रेल्वेच्या सूत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट आज लाँच केली जाणार नाही. ही वेबसाईट लाँच करण्यासाठी अद्याप काही काळ लागू शकतो. प्रवशांना आणखी 4 ते 5 आठवडे वाट पाहावी लागू शकते.
आयआरसीटीसीची नवीन अपडेटेड वेबसाईट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या वेबसाईटच्या लाँचिंगबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत, आता प्रवाशांना पुन्हा एकदा नव्या वेबसाईटसाठी वाट पाहावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
Realme चा नवा स्मार्टफोन! Realme P4R 5g; प्रत्येक खिशाला परवडणारा… एकूण बॅटरी पॉवर : 8000 mAh!
आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट अनेक नवीन फीचर्स आणि अपडेटसह लाँच केली जाणार आहे. नवीन वेबसाईट सुरु झाल्यानंतर तिकीट बुकींगची प्रोसेस आणखी सोपी होणार आहे आणि आताच्या तुलनेत अधिक वेगवान देखील होणार आहे. इतकंच नाही तर नवीन वेबसाईट जास्त यूजर फ्रेंडली आहे. ज्यामुळे वेबसाईट वापरताना हँग होणार नाही. याव्यतिरिक्त नव्या वेबसाईटमध्ये मल्टीलिंगुअल सपोर्ट, चांगली सीट निवडण्याचा पर्याय, भाडे वेळापत्रक आणि दिव्यांग व्यक्ती, रुग्ण आणि विद्यार्थ्यांसाठी एक चांगली एक्सेसिबिलिटी मिळणार आहे. इतकंच नाही तर गर्दीच्या हंगामात किंवा सणासुदीच्या काळात तिकीट बुक करताना होणारा त्रासही दूर होईल.






