X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव
कंपनीने जारी केलेले नवीन वर्जन गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या नव्या अपडेटबाबत सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ॲपचा लूक बदलण्याव्यतिरिक्त उत्तम स्क्रॉलिंग, फास्ट लोडिंग आणि ‘बेटर’ नोटिफिकेशन्स देखील मिळणार आहेत. ॲपमध्ये एक्स चॅट विंडोसाठी एक वेगळे बटन देखील देण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
एक्सच्या हेड ऑफ प्रोडक्ट निकिता बियर यांनी घोषणा केली आहे की, अँड्रॉईडसाठी रिडिझाईन करण्यात आलेले एक्स ॲपचे काम आता पूर्ण झाले आहे. यूजर्स गूगल प्ले स्टोअरमधून नवीन अपडेट डाऊनलोड करू शकणार आहेत. कंपनी एग्जीक्यूटिवचं असं मत आहे की, ॲप सुरुवातीपासून पुन्हा डिझाईन करण्यात आले आहे. बियर यांनी म्हटलं आहे की, या अपडेटमुळे टेक फर्मला अतिशय जलद गतीने नवीन फीचर्स सादर करता येतील. या अपडेटमध्ये कार्यक्षमतेतील सुधारणा तसेच अनेक नवीन डिझाइन बदलांचा समावेश आहे.
जुन्या वर्जनच्या तुलनेत नवीन अँड्रॉईड वर्जन जास्त वेगवान, स्मूद आणि विश्वसनीय आहे. ॲपचे फाऊंडेशन मॉडर्नाइज करण्यात आले आहे, ज्यामुळे स्क्रॉलिंग, लोडिंग आणि नोटिफिकेशन्सच्या बाबतीत यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.
नवीन ॲपमध्ये खालील बाजूला एक डॉक दिला आहे, जो बऱ्याच प्रमाणात आयओएस सारखा दिसतो. यामध्ये खालील बाजूला उजव्या कोपऱ्यात एक्स चॅटसाठी एक खास बटन देण्यात आले आहे. याशिवाय यूजर्स फुटबॉल, स्टॉक मार्केट, पॉलिटिक्स आणि स्पोर्ट्स सारखे वेगवेगळे विषय निवडून त्यांचे आवडते विषय सर्वात वर पिन करू शकतात. यामुळे यूजर्स नवीन टाईमलाईन तयार करू शकतात. तसेच यूजर्सची इच्छा असेल तर ते ‘फॉर यू’ आणि ‘फॉलोइंग’ टाइमलाइनमधून स्क्रोल करणे सुरू ठेवू शकतात.
माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म यूजर्सना नवीन अपडेटबाबत फीडबॅक देणं आणि कोणत्याही बग किंवा समस्येबाबत रिपोर्ट करण्यास सांगत आहे. बियर यांच असं मत आहे की, ॲपमध्ये अजूनही काही त्रुटी आहेत, ज्यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते. कंपनी जुन्या डिव्हाईसवरील कार्यक्षमता सुधारण्याची आणि ‘स्पेसेस’ होस्टिंगसारखी फीचर्स परत आणण्याची योजना आखत आहे. तसेच, व्हिडीओ आणि ऑडिओ एडीटर सारख्या दुसऱ्या फीचर्सचा समावेश देखील लवकरच केला जाणार आहे. कॅशटॅग्स आणि कस्टम टाइमलाइन्ससारखे फीचर्स ॲपमध्ये आधीपासूनच लाईव्ह आहेत.






