Tech Tips: फोनचं जुनं कव्हर फेकून देताय? थांबा... अशा 5 प्रकारे करा पुनर्वापर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
7000mAh बॅटरी अन् आकर्षक लूक! नव्या Honor स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; किंमत पाहून व्हाल चकित
बॅगेत चार्जिंग केबल आणि ईअरफोनचा गुंता होणं ही प्रत्येकाची अतिशय सामान्य समस्या आहे. हा गुंता सोडवण्यासाठी बराच वेळ वाया जातो. पण ही समस्या सोडण्यासाठी फोनचे कव्हर तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही तुमच्या जुन्या आणि थोड्या कडक अशा फोन कव्हरचा वापर केबल आणि ईअरफोन सुरक्षित ठेवण्यासाठी करू शकता. केबल गोल गुंडाळून व्यवस्थित कव्हरमध्ये अडकवून ठेवा. यामुळे चार्जिंग केबल आणि ईअरफोनचा गुंता होत नाही. यामुळे प्रवासात तुम्हाला एक चांगले केबल होल्डर देखील मिळते, ज्यामुळे तार तुटत नाही. (फोटो सौजन्य – AI Created)
जेव्हा तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईटमध्ये प्रवास करता, अशावेळी तुम्हाला तुमची बॅग ओळखताना थोडा गोंधळ उडतो. अशावेळी तुमच्या फोनचे जुने ट्रांसपेरेंट कवर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. एका रंगीत कागदावर तुम्ही तुमचे नाव, नंबर आणि पत्ता लिहून हा कागद ट्रांसपेरेंट कवरला चिकटवा. आता कव्हरमध्ये कॅमेऱ्यासाठी असलेल्या छिद्रातू एक किंवा रिबीन जोडून बॅगेच्या हँडलला बांधा. यामुळे तुम्हाला प्रवासात तुमची बॅग अगदी सहज ओळखता येईल.
जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांना रंगांसोबत खेळायला आवडत असेल तर स्मार्टफोनचे जुने फोन कव्हर त्यांच्यासाठी रंग मिक्स करणारा एक चांगला पेटिंग पॅलेट बनू शकतो. प्लॅस्टिक किंवा सिलिकॉन कव्हरवर पाण्याचे रंग अगदी सहज मिक्स केले जाऊ शकतात. विशेष म्हणजेच हे रंग धुतल्यानंतर कव्हर पुन्हा स्वच्छ होतं.
तुमच्या स्मार्टफोनच्या जुन्या कव्हरचे रुपांतर तुम्ही एका सुंदर फोटो फ्रेममध्ये देखील करू शकता. तुमचा कोणताही आवडता फोटो किंवा लहान मुलांनी तयार केलेले एक छोटे चित्र कव्हरच्या आकाराक कात्रीने कापा आणि कव्हरमध्ये लावा. कव्हरच्या मागच्या बाजूला एक छोटा चुंबक चिकटवा आणि ते तुमच्या फ्रिजवर लावा. ते खूपच गोंडस दिसते.
ताडोबाची मोठी कामगिरी! फुलपाखरे ओळखणारे देशातील पहिले ऑफलाइन AI ॲप लाँच, निसर्गप्रेमींसाठी मोठी भेट
जर तुमच्या घरात साबण ठेवण्यासाठी बाथरूम किंवा वॉशबेसिनजवळ साबणदाणी नसेल तर तुम्ही स्मार्टफोनच्या जुन्या सिलिकॉन कव्हरचा वापर करू शकता. कव्हरमध्ये एखाद्या गरम सुई किंवा खिळ्याने छिद्र करा, ज्यामुळे पाणी बाहेर येऊ शकते.






