(फोटो सौजन्य: Pinterest)
विचार न करता Permissions देऊ नका
अनेकदा नवीन ॲप इन्स्टाॅल केले की ते आपल्याकडे काही परमिशन्स मागते, आपण वेळ वाचावायचा म्हणून कोणताही विचार न करता सर्व परमिशन्स ऑन करतो पण यामुळे पुढे जाऊन मोठ्या समस्या वाढू शकतात. प्रत्येक ॲप आपल्याकडे कॅमेरा, मायक्रोफेन, लोकेशन आणि काही संवेदशनशील गोष्टींची परमिशन मागतो. तर अनेक ॲप्स बॅगराऊंडमध्येही या फिचरचा वापर करत असतात ज्यामुळे तुमचे वैयक्तिक आयुष्य धोक्यात येऊ शकते.
कॅमेरा आणि मायक्रोफेन ॲक्सेस
जर ॲपला कॅमेरा आणि मायक्रोफोनची परमिशन मिळाली आहे तर गरज लागल्यास तो या परमिशनचा वापर करतो. अनेकदा यूजर्सना याची माहितीही नसते की त्यांचा कॅमेरा आणि मायक्रोफोन ऑन आहे. Android फोनमध्ये स्क्रिनवर एक लहान ग्रीन लाईट दिसते ज्यावरुन आपल्याला कॅमेरा आणि मायक्रोफोन एक्टिव्ह असल्याचे समजते. जर तुम्हाला कोणत्या ॲपवर विश्वास नसेल तर त्याची ही परमिशन लगेच बंद करुन टाका.
लोकेशन ट्रॅकिंग
काही ॲप्स सतत तुमचे लोकेशन ट्रॅक करत असतात ज्यावरुन त्यांना तुम्ही कुठे आहात याची वेळोवेळी माहिती मिळत असते. याच्या मदतीने तुमच्या हालचाली आणि लोकेशन हिस्ट्रीची माहिती जमा होऊ शकते. यामुळेच एक्सपर्ट्स नेहमी Allow all the time हा पर्याय निवडण्यास नकार देतात. लोकेशनची परमिशन निवडताना कधीही Only while using the app या पर्यायाची निवड करावी. याच्या मदतीने फक्त ॲपचा वापर करतानाच तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाईल.
जुन्या ॲप्सचा धोका
आपल्या फोनमध्ये असे अनेक ॲप्स असतात जे आपण फार वापरत नाही किंवा महिन्यातून एकदाच त्यांचा वापर करतो. पण हे ॲप्स देखील परमिशनच्या जोरावर तुमचा डेटा गोळा करुन ठेवू शकतात. तथापि, Android मध्ये आधीपासून असे फिचर असते जे दिर्घकाळ न वापरलेल्या ॲप्सची परमिशन स्वत:च कॅन्सल करते.
WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही
एक्सपर्ट्स काय म्हणतात?
तज्ञांच्या मते, आपल्या फोनमधील App Permissions दर महिन्याला चेक करत राहायला हवेत. अनेक सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवरही यूजर्सने हे स्पष्ट केले आहे की, अज्ञात ॲप्सना परमिशन देणे आपल्या प्रायव्हसीचा धोका वाढवू शकते. तुम्ही बऱ्याच काळापासून जर तुमची प्रायव्हसी सेटिंग चेक केली नसेल तर आजच ती तपासा आणि नको असलेले Access आजच बंद करुन टाका.






