नवा अध्याय सुरु... महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव
महाराष्ट्र सरकार आणि स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्सने बुधवारी लेटर ऑफ इंटेंट (LoI) वर स्वाक्षरी केली आहे. लेटर ऑफ इंटेंट हे भारतातील सॅटेलाइट-बेस्ड इंटरनेट सेवेचे पहिले पाऊल आहे. स्पेसएक्सच्या या उपकंपनीला दूरसंचार विभाग (DoT) आणि भारत सरकारकडून नियामक मान्यता मिळाल्यानंतर ही भागीदारी अधिकृतपणे अंमलात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की, कंपनी राज्यातील सरकारी संस्था, ग्रामीण समुदाय आणि महत्त्वपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधांना खेडेगाव आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसोबत जोडणार आहे.
एक्सवर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की, महाराष्ट्र स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसह अधिकृतपणे जोडले जाणारे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. हा करार पूर्ण राज्यात सॅटेलाइट-बेस्ड इंटरनेट कनेक्टिविटी सुरु करण्याच्या उद्देशाने केला आहे. 5 नोव्हेंबरला मुंबईत Starlink चे व्हाईस प्रेसिडेंट लॉरेन ड्रेयर यांनी राज्यातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या करारावर स्वाक्षरी केली. ही भागिदारी महाराष्ट्रातील डिजिटल एक्सेस आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. (फोटो सौजन्य – X)
BIG NEWS!
Maharashtra Becomes India’s First State to Partner with Starlink! It was wonderful to welcome Ms. Lauren Dreyer, Vice President, Starlink in Mumbai today, where the Government of Maharashtra signed a Letter of Intent (LOI) with Starlink Satellite Communications Private… pic.twitter.com/8777O45ivq — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 5, 2025
राज्य सरकारने घोषणा केली आहे की, Starlink च्या सेवा सरकारी संस्था, ग्रामीण भागात आणि महत्त्वाच्या पब्लिक इंफ्रास्ट्रक्चरमध्ये सुरु केल्या जाणार आहेत. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशीम सारखे जिल्हे, जे दुर्गम किंवा वंचित म्हणून वर्गीकृत आहेत, त्यांना पहिल्या टप्प्यात कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. भौगोलिक परिस्थिती आणि कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी फाइबर नेटवर्क मिळणं शक्य होत नाही. त्यामुळे अशा भागांना आता स्टारलिंक नेटवर्कसोबत जोडलं जाणार आहे.
फडणवीस यांनी सांगितलं आहे की, हा उपक्रम राज्याच्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ मोहिमेशी जोडलेला आहे, जो डिजिटल सशक्तिकरण आणि लास्ट-माइल कनेक्टिविटीवर लक्ष केंद्रीत करतो. हि भागिदारी इलेक्ट्रिक मोबिलिटी इंफ्रास्ट्रक्चर, कोस्टल डेवलपमेंट प्रोग्राम्स आणि डिजास्टर मॅनेजमेंट सिस्टम्स सारख्या दूसऱ्या सरकारी प्रोजेक्ट्ससह देखील इंटीग्रेट केले जाणार आहे, जिथे नॉन-स्टॉप कनेक्टिविटी महत्त्वाची ठरणार आहे.
Elon Musk च्या SpaceX चे सब्सिडियरी Starlink लो-अर्थ ऑर्बिटमध्ये जगातील सर्वात मोठे सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्क चालवते. Space.com नुसार, ऑक्टोबरपर्यंत सुमारे 8,811 स्टारलिंक सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये होते. ज्यामधील 8,795 अॅक्टिव्ह होते. कंपनी जानेवारी 2025 पासून भारतात कमर्शियल सॅटेलाइट ब्रॉडबँड सर्विस सुरु करण्यासाठी रेग्युलेटरी अप्रूवलची वाट बघत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, हि भागिदारी केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मिशनला सपोर्ट करते. ज्याचा उद्देश देशभरात डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर आणि इंटरनेट एक्सेस अधिक चांगले करणे असा आहे. हा उपक्रम यशस्वी झाला तर इतर राज्यांसाठी देखील एक मॉडेल तयार केले जाऊ शकते.
Ans: Starlink ही Elon Musk यांच्या SpaceX कंपनीची सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा आहे जी जगभरात हाय-स्पीड इंटरनेट पुरवते.
Ans: Starlink साधारणपणे 100 Mbps ते 250 Mbps पर्यंत स्पीड देते, काही ठिकाणी त्याहून जास्तही असू शकतो.
Ans: Starlink सेवेची प्रारंभिक किंमत सुमारे ₹50,000 ते ₹60,000 (एकदा सेटअप चार्ज) आणि दरमहा ₹8,000–₹10,000 इतकी असू शकते.






