मेट्रो अॅक्वा लाईन 3 वरील 16 स्थानकांवर 'Vi'ची नेटवर्क सेवा उपलब्ध
अॅक्वा लाईन ३ मेट्रोच्या दररोज २९० पेक्षा जास्त फेऱ्यांमध्ये १.५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ही मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहे. आता ‘वी’ चे ग्राहक सर्व मेट्रो स्थानके, प्लॅटफॉर्म आणि प्रवासाच्या दरम्यान पुन्हा एकदा अखंड नेटवर्क कनेक्टिविटीचा आनंद घेऊ शकतील. प्रवाशांना आता प्रवासात असतानाही व्हॉईस कॉल करणे, हाय-स्पीड इंटरनेट वापरणे, डिजिटल पेमेंट अॅप्स वापरणे, सोशल मीडियावर कनेक्टेड राहणे आणि आपली कामे सुरू ठेवणे सहज शक्य होईल.
सायन्स सेंटर मेट्रो स्टेशन ते कफ परेड दरम्यानच्या ११ स्थानकांचा समावेश असलेल्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील नेटवर्क उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबईच्या या विस्तारणाऱ्या मेट्रो नेटवर्कमध्ये ग्राहकांना अखंड कनेक्टिविटीचा लाभ घेता यावा यासाठी, आगामी काही आठवड्यांत उर्वरित सर्व मेट्रो मार्गावर आपली सेवा विस्तारण्याचा ‘वी’ चा मानस आहे.
वोडाफोन आयडियाचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री जगबीर सिंग म्हणाले, “विश्वासार्ह कनेक्टिविटी हा प्रत्येकाच्या रोजच्या प्रवासात एक आवश्यक भाग आहे. मुंबई मेट्रो नेटवर्कच्या अॅक्वा लाईन ‘फेज १’ वर आमची सेवा उपलब्ध झाली आहे आणि ‘फेज २’ वरील सेवा देखील लवकरच सुरू होईल, याचा आम्हाला खूप आनंद आहे. ग्राहकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी नेटवर्क उपलब्धता मजबूत करण्यासाठी आणि गर्दीच्या शहरी भागांमध्ये अखंड कनेक्टिविटीचा अनुभव देण्यासाठी आम्ही सातत्याने वचनबद्ध आहोत हे यामधून दिसून येते.”






