राक्षसी बॅटरी अन् दमदार कॅमेरा... नव्या Xiaomi स्मार्टफोनने उडवली सर्वांचीच झोप, डिझाईनने जिंकलं यूजर्सचं मन
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 256GB आणि 512GB अशा दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंंमत 59,999 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंंमत 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. एचडीएफसी बँक, एसबीआय कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस आणि आयसीआयसीआय बँक कार्डांवर 5,000 रुपयांपर्यंतचे फ्लॅट डिस्काऊंट उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Xiaomi )
बँक ऑफरससह या डिव्हाईसवर 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे. बँक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह या नव्या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. त्यामुळे ग्राहक 256GB व्हेरिअंट 54,999 रुपयांत आणि 512GB व्हेरिअंट 59,999 रुपयांना खरेदी करू शकणार आहेत. तसेच, तुम्ही नो-कॉस्ट ईएमआय आणि झिरो डाऊन पेमेंटवरही फोन खरेदी करू शकता.
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 6.59-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेट देखील मिळणार आहे आणि याची पीक ब्राइटनेस 3,500 निट्सपर्यंत जाऊ शकते.
फोनला पावर देण्यासाठी यामध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 8500-अल्ट्रा प्रोसेसर दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 12GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.
फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी Xiaomi 17T मध्ये Leica-सपोर्टेड ट्रिपल रियर कॅमेरा देखील मिळणार आहे. या डिव्हासईमध्ये 50-मेगापिक्सेलचा लाईट फ्युजन 800 प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा Leica 5x पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देखील मिळणार आहे.
शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा
कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6,500mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे, जी 67W हाइपरचार्ज फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
Ans: Redmi हा Xiaomi चा सब-ब्रँड आहे. Redmi मुख्यतः बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनसाठी ओळखला जातो.
Ans: होय, Xiaomi कडे बजेटपासून प्रीमियम श्रेणीपर्यंत अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.
Ans: Xiaomi स्मार्टफोनमध्ये Android आधारित HyperOS इंटरफेस मिळतो.






