अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भिजलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. अवकाळी पावसामुळे भिजलेला कांदा व्यापारी घेत नाही. तसेच ओल्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे. प्रशासनाकडून पंचनामे देखील लवकर करत नसल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत. त्यामुळे सरकारी मदतीची ही अपेक्षा या शेतकऱ्यांनी सोडली आहे. त्यामुळे बळीराजावर सद्या दुहेरी संकट ओढवले गेले आहे. राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नाही. यातच अवकाळी मुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं आहे.