बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज तब्बल 84 दिवसानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामानंतर महाराष्ट्रभरातील मराठा समाज बांधवांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागले आहे. अहिल्यानगर शहरातील मराठा समाज बांधवांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारच मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होतं असे आता दिसून येत असल्याचे म्हणत आता तरी मुंडेंना या प्रकरणात सहआरोपी करून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी मराठा समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.