(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
तुम्ही आतापर्यंत स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील पण या व्हायरल व्हिडिओतील दृष्य मात्र तुम्हाला थक्क करुन सोडतील. यामध्ये व्यक्तीने त्याच्या बाईकचा अक्षरश: झोपाळ बनवल्याचे दिसते. आपल्या बाईकला रश्शीला बांधून ही रश्शी त्याने झाडाला मजबूत बांधलेली असते. यानंतर बाईक सुरु करुन तो बाईकला हवेत उचलू पाहतो. रश्शी बाईकला बांधल्याने ती काही अंतरावर हवेत उडते आणि मग पुन्हा जमिनीवर आदळते. एखाद्या झोपाळ्यावर झुलावी तशी ही बाईक व्हिडिओत झुलताना दिसते. व्हिडिओतील हा स्टंट पाहताना बाईकचा अपघात होतोय का काय अशीही भिती अनेकांच्या मनात येते पण व्यक्ती फार सराईतपणे स्टंट पूर्णत्वास नेतो. व्यक्तीचा हा स्टंट इतका अजब-गजब असतो की तो पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमल्याचेही व्हिडिओत दिसते.
भाई ये वाला स्टंट देखकर तो दीमाक ही हिल गया.
रील व्यू की चक्कर में मतलब कुछ भी..😂😂 इस मूर्ख के लिए बस दो शब्द लिखे.👇😀 pic.twitter.com/lR1AFGbgHe — Gulzar’s Diary.🏔️🌿 (@drx_gulzar) July 28, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @drx_gulzar नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘भावा, हा स्टंट पाहून माझं डोकं फिरलं. व्हिडिओ व्ह्यूजसाठी काहीही…’. व्हिडिओ सध्या इंटरनेटवर शेअर केला जात असून अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “असे लोक आपला जीव धोक्यात का घालतात, ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची थोडीसुद्धा काळजी घेत नाहीत?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे असेच चालू राहिल्यास, अपघात कधीही होऊ शकतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा तो मूर्ख आहे, आपला जीव धोक्यात घालत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






